Author: Ramchandra Bari

पाच महिन्यांचे वेतन रखडले
“डायट” यंत्रणेचे काळ्या फिती लावून कामकाज

नंदुरबार (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत राज्यातील 34 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) सुमारे 850 अधिकारी व कर्मचारी गेल्या 5 महिन्यांपासून वेतन रखडल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. नियमित वेतनासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याबाबत शासनास यापूर्वीच इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार दि. 24/09/2020 पासून राज्यातील डायटमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून कामकाजास निषेधात्मक सुरुवात केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कार्यरत असून, नंदुरबार येथे ही शासकीय संस्था सन 2011 पासून कार्यरत आहे. या संस्थे अंतर्गत प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, अधीक्षक हे वर्ग 1 व वर्ग 2 चे अधिकारी व कार्यालयीन...

Read More

शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीबाबत आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : खरीप हंगाम 2020-2021 मध्ये राज्यात नाफेडच्यावतीने केंद्र शासनाने  निश्चित केलेल्या हमीभावाने मूग, उडीद या कडधान्याच्या खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली आहे. नोंदणीसाठी  धुळे तालुका खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लि.धुळे येथे स्वप्नील देवरे (8888088483), शिरपुर तालुका सहकारी खरेदी विक्री सोसायटी लि.शिरपुर जि.धुळे येथे दर्शन देशमुख (9422123929), शिंदखेडा ता.सहकारी खरेदी विक्री संघ लि.दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे येथे भगवान पाटील (9284429877), शेतकरी सहकारी संघ लि.नंदुरबार येथे दिपक पांढरे (9130809012) आणि शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.शहादा जि.नंदुरबार येथे  सागर पाटील (7770074177) यांच्याशी  संपर्क साधावा, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी  नंदुरबार यांनी कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!