Author: Ramchandra Bari

कोळदा येथे स्वॅब तपासणी शिबीर संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :   ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत शहादा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लहान शहादा येथे कोरोना स्वॅब चाचणी शिबीराचे आयोजन करण्यात आले .             यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जे.आर.तडवी, सरपंच जिजाबाई पाडवी, ग्राम विस्तार अधिकारी संजय देवरे, डॉ.सुनिल वळवी, डॉ.किर्ती सुर्यवंशी, डॉ.अश्विनी देसले, डॉ.मनिष नार्दे उपस्थित होते. यावेळी डॉ.तडवी यांनी स्वॅब तपासणी शिबीरास भेट देऊन कामाची पाहणी केली. गावातील नागरिकांशी संवाद साधताना मास्कचा वापर, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ धुण्याबाबत आवाहन करण्यात आले. स्वॅब चाचणीबाबत नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी शिबिराला चांगला प्रतिसाद दिला. गावातील  70 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. गावात घरोघरी जाऊन नागरिकांच्या...

Read More

एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्रावर नियमांचे पालन करावे- डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने एमएचटी-सीईटी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोरोना संदर्भातील नियमाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले  आहे.             एमएचटी सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर डॉ.भारुड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा सूचना अधिकारी धर्मेद्र जैन, जिल्हा कोषागार अधिकारी वैशाली जगताप, तहसिलदार उल्हास देवरे, महाऑनलाईनचे जिल्हा समन्वय राहुल वाघ, तंत्रनिकेतन महाविद्यालय, शहादाचे प्राचार्य सुनिल अंधारे, शासकीय तंत्रनिकेतनचे वरिष्ठ अधिव्याख्याता एम.एम.गोस्वामी आदी उपस्थित होते.             सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षाकरीता पीसीबी गटासाठीच्या सामायिक परीक्षा 2020 (एमएचटी-सीईटी) ऑनलाईन पद्धतीने 1 ते 9 ऑक्टोंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. परीक्षा सकाळी 7-30 ते दुपारी 12 तसेच दुपारी 12-30 ते सायंकाळी 6.45 या दोनसत्रात होईल. ही परीक्षा जिल्ह्यासाठी डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय लोणखेडा ता.शहादा केंद्रावर घेण्यात येणार असून 480 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.             एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनीच परीक्षा केंद्रावर यावे. अनावश्यक गर्दी करु नये, परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांनी मास्क, सॅनिटायझर, व शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांना परीक्षा केंन्द्रावर जाण्यासाठी गैरसोय टाळण्यासाठी परिवहन महामंडळाने बसेसची उपलब्धता करावी व परीक्षा सुरळीत पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले...

Read More

नामनिर्देशनासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : अल्पसंख्यांक कल्याणाकरिता पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीची पुर्नरचना करण्यासाठी ग्रामीण तसेच नागरी क्षेत्रातील अल्पसंख्याक कल्याणाशी संबधित स्थानिक पंचायतराज संस्थांचे प्रतिनिधी आणि  जिल्ह्यातील अल्पसंख्यांकासाठी काम करणाऱ्या 3 नामवंत अशासकीय स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची नामनिर्देशने अल्पसंख्याक विकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत.  इच्छुकांनी नामनिर्देशनासाठी आपले प्रस्ताव 8 ऑक्टोंबर 2020 रोजी  सायंकाळी  5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय (सामान्य शाखा ) जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे सादर करावे,  असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!