Author: Ramchandra Bari

खाजगी रोपवाटीका योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्यशासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर खाजगी रोपवाटीका योजना सुरु केली असून योजनेचा  लाभ घेण्यासाठी 2 ऑक्टोंबर ते 19 ऑक्टोंबर 2020 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना प्रकल्प स्वरुपात राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. मात्र शेडनेटमधील चारही घटकांची एकाच ठिकाणी उभारणी करणे बंधनकारक आहे. टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची व कांदा आणि इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटीका उभारणी करणे गरजेचे आहे. शेडनेट गृह 1000 चौ.मी. 3.25 मीटर उंचीचे ग्रीड साईज 6 मीटर बाय 6 मीटर आणि  सांगाडा उभारणीचा खर्च 380000 रु.  आणि अनुदान 190000 रु., पॉलीटनेल – 1000 चौ.मी.मध्ये प्रकल्प खर्च  60000 रु. आणि अनुदान 30000 रु., एक पॉवर नॅपसॅक स्पेअरचा खर्च 7600 रु. आणि अनुदान 3800 रु., तर 62 प्लास्टीक क्रेटसचा खर्च 12400 रु.  आणि अनुदान  6200 रु.,  असा एकूण खर्च 460000 रु. असून याला 230000 रु. अनुदान मिळणार आहे.             या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची 1 एकर जमीन आणि पाण्याची कायमची सोय असावी. महिला कृषि पदवीधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून महिला शेतकरी गटाला द्वितीय प्राधान्य राहणार आहे. यानंतर भाजीपाला उत्पादक, अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आणि शेतकरी गटांना प्राधान्य असणार आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in   या संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकारी  यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  अ.ना.पोटे यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!