Author: Ramchandra Bari

तहसिलदार थोरात यांनी ग्रामस्थांशी साधला संवाद आरोग्य तपासणीस सहकार्य करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी नंदुरबार तालुक्यातील सुजालपूर, नाशिंदे, बोराळे, आणि कोरीट या गावांना भेट देवून माझे ‘कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेबाबत ग्रामस्थाचे समुपदेशन केले आणि त्यांना आरोग्य तपासणीस सहकार्य करण्याचे आवाहन केले.             जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ग्रामस्थांमध्ये मोहिमेबाबत गैरसमज असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार श्री.थोरात यांनी या गावातील सरपंच आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. आरोग्य तपासणीमुळे कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार लक्षात आल्यास त्यावर वेळीच उपचार करता येतील. तसेच कोरोनाची लक्षणे आढळल्यास स्वॅब चाचणी होईल, अन्यथा केवळ माहिती घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थानीदेखील आरोग्य तपासणीत सहकार्य करण्याचे मान्य केले.             यावेळी सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि गावातील प्रतिष्ठीत नागरीका  समवेत बैठक घेवून त्यांना मोहिमे विषयी माहिती देण्यात...

Read More

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांचा दौरा कार्यक्रम

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार 1 ऑक्टोंबर 2020 रोजी संध्याकाळी 7 वाजता शिरपूर जि.धुळे येथून नंदुरबार येथे आगमन व मुक्काम. त्यानंतर 2  ते 3 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत नंदुरबार येथे राखीव. रविवार 4 ऑक्टोंबर 2020 रोजी संध्याकाळी 6 वाजता नंदुरबार येथून असली ता.अक्राणीकडे रवाना. सोमवार 5 ऑक्टोंबर 2020 रोजी दुपारी 2.00 वाजता असली ता.अक्राणी येथून मुंबईकडे...

Read More

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम जिल्हाधिकाऱ्यांनी नवापूर येथे घेतला आढावा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा ) : जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी नवापूर येथे भेट देऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा आढावा घेतला.               यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उपजिल्हाधिकारी महेश सुधळकर, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार सुनिता जऱ्हाड,  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशीकांत वसावे, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत उपस्थित होते.               जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीची पाहिणी केली आणि सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी उपजिल्हा रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील सुविधांची माहिती घेतली. त्यांनी बेडकी पाडा येथे मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणाला भेट दिली व नागरिकांशी संवाद साधला.               डॉ.भारुड यांनी सर्वेक्षणाचे...

Read More

लोकशाही दिनाचे आयोजन नाही

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 5 ऑक्टोंबर रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित होणार नाही.  लोकशाही दिनात अर्ज करावयाचा असल्यास अर्जदारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता आपले तक्रार अर्ज [email protected]  या ईमेलवर किंवा 9403644685 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठविण्यात यावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!