Author: Ramchandra Bari

कोरोना उपचारासाठी जिल्ह्याला 10 हाय फ्लो मशिन प्राप्त

 नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना उपचारात व्हेंटीलेटरला जोडण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाला एनएसई फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून 10 हाय फ्लो नेझल कॅन्युला मशिन (एचएफएनसी) प्राप्त झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची अधिक प्रमाणात आवश्यकता असते. अशावेळी व्हेंटीलेटर्सद्वारे मिळणारा ऑक्सिजनही कमी पडू शकतो. व्हेंटीलेटरला एचएफएनसी जोडल्याने ऑक्सिजनचा प्रवाह अधिक प्रमाणात होतो व रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन मिळाल्याने त्याचे प्राणदेखील वाचविता येतात. जिल्हा शासकीय रुग्णालीयात पीएम केअर फंडातून प्राप्त झालेल्या 48 व्हेंटीलेटर्ससाठी ही सुविधा होती. रुग्णालयातील इतर 10 व्हेंटीलेटर्ससाठी एनएसई फाऊंडेशनने एका संयंत्रासाठी 4 लाख 31 हजार याप्रमाणे 43 लाख रुपये किंमतीचे एचएफएनसी उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हा रुग्णालयात कोरोना आजारावर उपचार...

Read More

ग्लोबल शोकेस सादरीकरणात सहभाग नोंदवावा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काल्लेखेतपाडा ता.धडगाव या शाळेचा शिक्षण क्षेत्रात सुशासनाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासाचे 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजेदरम्यान व्हर्च्युअल कार्यक्रमातंर्गत सादरीकरण करणार आहे. या ग्लोबल शोकेस मध्ये सहभागासाठी http://bit.ly/2GnoVMGs   या लिंकवर नोंदणी करावी व सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) बी.आर.रोकडे यांनी केले आहे. रजिस्ट्रेशनच्या तांत्रिक मदतीसाठी जिल्हा समन्वयक श्रीमती सोनल शिंदे (7887585807)  रविकांत ठाकरे (7774077968)  ग्यानप्रकाश फाऊन्डेशन,पुणे यांचेशी संपर्क...

Read More

शेतकऱ्यांनी फळ पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा : पुनर्रचित हवामान आधारीत फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2020-2021 अंतर्गत  द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा, काजू व स्ट्रॉबेरी (प्रायोगीक तत्वावर ) या 8 फळ पिकासाठी  प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार  शेतकऱ्यांना ऐच्छिक राहील. अधिसूचीत क्षेत्रातील अधिसूचित फळपिके घेणारे खातेदांराचे अतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत अर्ज  करू शकतात. आंबिया बहारातील गारपीट या हवामान धोक्यासाठी अतिरीक्त विमा संरक्षण देण्यात येत असून त्यासाठी अतिरीक्त विमा हप्ता शेतकऱ्यांना देय आहे. जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा असेल. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. संत्रा, मोसंबी पिकांसाठी उत्पादनक्षम वय 3 वर्ष, डाळिंब व द्राक्ष 2 वर्ष  तर आंबा व काजूसाठी उत्पादनक्षम वय 5 वर्ष आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा  लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीस निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.  कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे अपेक्षित आहे, जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर शेतकऱ्यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतकऱ्यांना आंबिया बहार सन 2020-2021 याहंगामा करिता योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल. शेतकऱ्यांनी आंबिया बहार द्राक्ष पिकासाठी 15 ऑक्टोबर, मोसंबी व केळी पिकासाठी 31ऑक्टोबर, संत्रा, काजू 30 नोव्हेंबर, आंबा व डाळिंब पिकासाठी 31 डिसेंबर...

Read More

राज्यसेवा पुर्व परीक्षा-2020 परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग राज्यसेवा पुर्व परीक्षा-2020  दोन सत्रात 11 ऑक्टोबर 2020 रोजी नंदुरबार येथे  घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र  भारुड यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार  परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे. शहरात श्रीमती एच.जी.श्रॉफ हायस्कूल आणि ज्यु.कॉलेज मोठा मारुती मंदिराजवळ नंदुरबार, जी.टी.पाटील महाविद्यालय भाग-1  आणि भाग-2 नंदुरबार, दुर्गाबाई रघुवंशी हायस्कुल मुख्य डाक कार्यालय जवळ शनि मंदिर रोड नंदुरबार, कमला नेहरु कन्या विद्यालय नेहरु चौक स्टेशन रोड नंदुरबार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल मुख्य डाक कार्यालय जवळ अंधारे स्टॉप, नंदुरबार अशा 6 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी 7  वाजेपर्यंत कोणीही प्रवेश करु नये. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीसाठी  बंद ठेवण्यात यावेत, असे ही आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

जिल्ह्यात 261 अंगणवाडी इमारतीच्या बांधकामास मंजूरी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात आदिवासी विकास योजना आणि आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत 261 अंगवाडी इमारत बांधकामास गेल्या वर्षभरात मंजूरी देण्यात आली आहे. नवीन अंगणवाडी बांधकाम आणि 2016 पासून अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या निर्देशानुसार आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जमाती उपयोजना (टीएसपी) अंतर्गत 200 अंगणवाड्यांसाठी 11 कोटी 81 लाख 80 हजार वितरीत करण्यात आली आहे. तर आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत 61 अंगणवाड्यांना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2 कोटी 90 लाख 80 हजाराचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. टीएसपी अंतर्गत मंजूरी देण्यात आलेल्या अंगणवाड्यांमध्ये अक्कलकुवा 95, धडगाव 46, तळोदा 12, शहादा 19, नंदुरबार 8 आणि नवापूरमधील 20 अशा 200 अंगणवाड्यांचा समावेश आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत मंजूरी देण्यात आलेल्या अंगणवाड्यांमध्ये अक्कलकुवा 1, मोलगी 4, धडगाव 16, खुंटामोडी 3, तळोदा 5, शहादा 13, म्हसावद 6, नंदुरबार 6, रनाळा 6 नवापूरमधील 1 अशा 61 अंगणवाड्यांचा समावेश आहे. तसेच अंगणवाडी दुरुस्तीसाठी टीएसपी अंतर्गत 95 अंगणवाड्यांसाठी 93 लाख 59 हजार वितरीत करण्यात आले आहेत, तर आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत 18 अंगणवाड्यांना दूरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी 9 लाख 20 हजार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. टीएसपी अंतर्गत दुरुस्तीसाठी मंजूरी देण्यात आलेल्या अंगणवाड्यांमध्ये अक्कलकुवा 19, धडगाव 3, तळोदा 23, शहादा 21, नंदुरबार 25 आणि नवापूरमधील 4 अशा 95 अंगणवाड्यांचा समावेश आहे आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत दुरुस्तीसाठी  मंजूरी देण्यात आलेल्या अंगणवाड्यांमध्ये शहादा 8, रनाळा 10 अशा 18 अंगणवाड्यांचा समावेश आहे  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मोहिम स्तरावर इमारतीचे बांधकाम व्हावे...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!