Author: Ramchandra Bari

स्थानिक प्राधिकारी मतदार संघ पोटनिवडणूक

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :- धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या पोट निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.  मतदानानिमित्त 29 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ते 1 डिसेंबर 2020 रोजी (मतदानाच्या दिवशी )  सायंकाळी 5 वाजेपर्यंत तसेच 3 डिसेंबर 2020 रोजी ( मतमोजणीच्या दिवशी ) सकाळी 6 वाजेपासून  ते  सायंकाळी 5 वाजेपर्यंत  किरकोळ मद्य विक्री करणाऱ्या एफएल-2, एफएल-3, सीएल-3,सीएल / एफएल/ टीओडी-3 आणि एफएल/ बीआर-2 अशा सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

क्षयरोग व कुष्ठरोग शोध अभियान वेळेत पूर्ण करा- डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :- क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मुलन अभियान वेळेत पूर्ण करा आणि गेल्या पाच वर्षात क्षयरोग रुग्ण अधिक आढळलेल्या गावातील प्रत्येक घरात आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत  होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, डॉ.राजेश वळवी, सहायक संचालक डॉ. अभिजीत गोल्हार आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, संयुक्त क्षयरुग्ण व कुष्ठरोग शोध अभियानात आरोग्य तपासणी चांगल्यारितीने करण्यात यावी. अधिक रुग्ण आढळणाऱ्या गावांवर लक्ष केंद्रीत करावे. इतरही आजार असलेल्या क्षयरोग रुग्णांच्या उपचाराकडे विशेष लक्ष द्यावे. कुष्ठरोग व क्षयरोग...

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी महेश सुधाळकर,  तहसिलदार उल्हास देवरे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित...

Read More

अंगणवाडी सेविका रेलू वसावे यांचा प्रशासनातर्फे सत्कार

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): अक्कलकुवा तालुक्यातील चिमलखेडी येथील अंगणवाडी सेविका रेलू वसावे यांनी कोरोना संकटाच्या काळात स्वत: बोटीने प्रवास करून दुर्गम भागात सेवा दिल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला. चिमलखेडी अंगणवाडीला चांगल्या सुविधा देणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सांगितले. रेलूताईंच्या कार्याचे देशभरात कौतुक होत असताना त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भुपेंद्र बेडसे, कृष्णा राठोड, रेलूताईंचे पती रमेश वसावे, अंगणवाडी मदतनीस सोनीबाई वसावे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी भारुड यांनी साडीचोळी, अभिनंदनपत्र आणि मिठाई देऊन...

Read More

रेल्वे व रस्तेमार्गे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा :  कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच जिल्ह्याला गुजरात राज्याची सीमा लागून असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात  रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशाची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. रेल्वे वाहतूक मार्गे येणाऱ्या राष्ट्रीय राजधानी दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून येणाऱ्या, थांबा असणाऱ्या रेल्वेतून नंदुरबार तसेच नवापूर रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह अहवाल सोबत असणे बंधनकारक राहील. जिल्ह्यात येण्यापुर्वी 96 तास आधी आरटीपीसीआर चाचणीचे नमुने घेणे आवश्यक असेल. नंदुरबार व नवापूर रेल्वे स्टेशनवर उतरणाऱ्या ज्या प्रवाशाकडे आरटीपीसीआर चाचणीचे निगेटीव्ह रिपोर्ट नसतील अशा प्रवाशांची कोविड-19 ची लक्षणे व शरीराचे तापमान बाबत तपासणी करण्यात यावी.             दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा राज्यातून रस्ते मार्गे जिल्ह्यात येणाऱ्याची कोविड-19 लक्षणे व शरीराचे तापमान तपासणी करण्यात यावी. ज्या प्रवाशांना लक्षणे नसतील अशाच प्रवाशांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास मुभा असेल. लक्षणे आढळून आल्यास प्रवाशांना विलग करुन ॲन्टीजन चाचणी करण्यात येईल. अहवाल निगेटिव्ह आल्यास अशानाच पुढे प्रवास करण्यास मुभा असेल. रेल्वे व रस्ते मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना त्वरीत उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. होणारा खर्च प्रवाशांनी करावयाचा आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!