Author: Ramchandra Bari

हत्तीपाय रुग्णानाही मिळणार दिव्यांगाच्या सर्व सुविधा – रविंद्र सोनवणे

नंदुरबार (जिमाका वृत्त) – जिल्ह्यातील हत्तीपाय रुग्णांची पायाच्या सुजेवरुन तीव्रता तपासणी करुन त्यानुसार दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार असून आता हत्तीपाय रुग्णानाही दिव्यांगाच्या सर्व प्रकारच्या सुविधा मिळणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी रविंद्र सोनवणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमातंर्गत हत्तीपाय व अंडवृध्दी हे हत्तीरोग आजाराचे लक्षण असून हत्तीपाय रुग्णांमध्ये ठराविक वृध्दीनंतर रुग्णाचा हालचालीवर कमालीची बंधने येतात. रुग्ण मुक्तपणे फिरु शकत नाही त्यामुळे ठोस कृती कार्यक्रम आखुन या रुणांना दिलासा देण्यासाठी अशा रुग्णांची तपासणी करुन दिव्यांग प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने मार्गदर्शन सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे नुकतेच दिव्यांग प्रमाणपत्रासाठी हत्तीपाय रुग्णांची तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबीरात एकूण 21 हत्तीपाय रुग्णांच्या पायाच्या सुजेवरुन तीव्रता तपासणी करण्यात आली असून त्यानुसार त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्यांनाही आता दिव्यांगाच्या सर्व सुविधा मिळतील. या शिबीरास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी पंकज बागुल, जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व हिवताप आरोग्य पर्यवेक्षक व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित...

Read More

क्रीडा प्रबोधनीत सरळ व चाचणीद्वारे खेळाडूंना प्रवेश देणार – सुनंदा पाटील

नंदुरबार (जिमाका वृत्त) – शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधनीमध्ये सन 2024-25 साठी सरळ व कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना नवीन प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. राज्यातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जेचे खेळाडू देण्यासाठी राज्यातील प्रतीभवन खेळाडूची निवड करून त्यानां संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरविणे व सुसंघटीत करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधनी कार्यरत असून या प्रबोधनींमध्ये  प्रवेशासाठी 50 टक्के सरळसेवा व 50 टक्के कौशल्य चाचणीच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहे. राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपुर, औरंगाबाद, गडचिरोली अशा 9 ठिकाणच्या क्रीडा प्रबोधनीमध्ये निवड प्रक्रीया होणार असून ज्युदो, जिम्नॅस्टीक, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेस्टीक, कुस्ती, बॅडमिंटन, अर्चरी, हॅन्डबॉल, वेटलिफ्टींग अशा एकूण 17 क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. क्रीडा प्रबोधिनीतील सरळ प्रवेश प्रक्रियेसाठी खेळाडू हा संबधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू असावा. खेळाडूचे वय 19 वर्षाआतील असावे  अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबत समिती समक्ष चाचणी देऊन प्रवेश देण्यात येईल, क्रीडा प्रबोधिनीत खेळ निहाय कौशल्य चाचणीसाठी संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडू असावा. खेळाडूचे वय 19 वर्षाआतील असावे अशा खेळाडूना संबंधित खेळाचे कौशल्य चाचणीचे आयेाजन करुन गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येईल. या चाचणीमधून निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाव्दारे चाचणी घेण्यात येईल व त्यानंतर अंतिम निवड करण्यात येईल. जिल्हास्तरावर चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी 5 जुलै 2024 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल,...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!