Author: Ramchandra Bari

समता सप्ताहा निमित्त ‘संविधान जागर’ कार्यक्रम संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती जिल्ह्यात दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. या सप्ताहांच्या अनुषगांने आज ‘संविधान जागर’ या विषयावर अनु.जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेली जि. नंदुरबार येथे तळोदा समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.रामचंद्र परदेशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. या कार्यक्रमांस समाज कल्याण सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर,  गृहपाल गणेश देवरे, समाज कल्याण निरीक्षक सिताराम गांगुर्डे, प्रदीप वसावे, समाज कल्याण विभागातील निवासी शाळेतील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्रा.परदेशी यांनी ‘भारताचे संविधान व आपले हक्क’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. आज आपल्याला जे  संविधानिक हक्क मिळालेले आहे. त्यामुळेच आज आपण मोठया निर्भयतेने फिरू शकतो, अन्यायाविरूध्द वाचा फोडू शकतो, सन्मानाने शिक्षण घेवू शकतो असे त्यांनी सांगितले. यावेळी सहायक आयुक्त नांदगांवकर यांनी भारतासारख्या देशात हजारो जाती, पंथामध्ये विभागलेल्या या देशाला एकत्र आणण्याचे काम भारताच्या संविधानात असलेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या विचारामुळेच प्राप्त झालेले आहे. संविधानात असलेल्या मुलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वामुळे प्रत्येक भारतीयाला एक आदर्श परिपाठ दिलेला आहे. म्हणून संविधानाचे आपल्या जीवनात अन्यनसाधारण महत्व आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीस निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘भारताचे संविधान’ या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.  सुत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात...

Read More

समता सप्ताहाअंतर्गत ‘मार्जिन मनी कार्यशाळा’ संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती जिल्ह्यात दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. या सप्ताहांच्या अनुषगांने 12 एप्रिल रोजी अनु.जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेली जि.नंदुरबार येथे स्टॅन्ड अप इंडिया अंतर्गत मार्जिन मनी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेला समाज कल्याण सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.बेनकुळे, कार्यालयीन अधीक्षक दिलीप कोकणी, समाज कल्याण निरीक्षक सिताराम गांगुर्डे, प्रदीप वसावे, गृहपाल गणेश देवरे, समाज कल्याण विभागातील निवासी शाळेतील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री.बेनकुळे यांनी मार्जिन मनी योजनेविषयी  शासनाचे धोरण, अटी, नियम,पात्रता व उद्योजकाविषयी महत्व तसेच बँकेमध्ये प्रस्ताव सादर करतांना उद्योजकाकडे कोणती कागदपत्रे, नाहरकत प्रमाणपत्रे असावीत या विषयी मार्गदर्शन केले. या वेळी विविध बँकेकडून, महामंडळाकडू कर्ज घेतलेल्या व वेळेवर कर्ज परतफेड केलेल्या उद्योजकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सहायक आयुक्त नांदगांवकर यांनी स्टॅण्ड अप योजनेचे महत्व विषद केले. मुख्याध्यापिका श्रीमती.बोरसे यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रमोद पवार यांनी...

Read More

खरीप हंगामासाठी बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करावे जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जांचे बियाणे, रासायनिक खते,कीटकनाशके, आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषि निवष्ठा सनियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी त्याबोलत होत्या. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी  एल.डी.भोये, महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक बी.जी.कोटकर, मोहिम अधिकारी महेश विसपुते, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी, पंचायत समितीचे कृषि अधिकारी योगेश हिवराळे, एकनाथ कदम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, खरीप हंगाम 2022-2023 साठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन येणाऱ्या बियाणे चांगल्‍या दर्जाची असावेत. प्रत्येक विक्रेत्याने साठा तसेच...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!