Author: Ramchandra Bari

मान्सून काळात धरणांवर वायरलेस यंत्रणा कार्यान्वित करावी

 नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : येत्या मान्सून काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लघू व मध्यम प्रकल्पांची संयुक्त पाहणी करुन धरणांवरील वायरलेस यंत्रणा कार्यान्वित राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने पाटबंधारे विभागास दिल्या आहेत. जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने कळविल्यानुसार, कार्यकारी अभियंता यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या लघू व मध्यम प्रकल्पांची दुरुस्ती मान्सून सुरु होण्यापूर्वी करावी. यासाठी संबंधित कार्यकारी अभियंता यांनी लघु व मध्यम प्रकल्पांची पाहणी करुन धरण, प्रकल्प सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे. धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग, नद्यांच्या पाणीपातळीनुसार सोडण्याचे नियोजन करावे. विसर्ग सोडण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची मान्यता घेण्यात यावी व त्याबाबतची पूर्व कल्पना प्रशासनास द्यावी. नदी किनाऱ्यावरील सखल भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना नदीच्या पाणी पातळीबाबत पूर्वसूचना देण्यात यावी.रात्री, अपरात्री पुर्वसूचना देता येईल अशी यंत्रणा स्थापित करावी.यासाठी नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. पुरग्रस्त गावे दर्शविलेला नकाशा जिल्हाधिकारी यांना सादर करावा. दैनदिन पाणीसाठा, पाण्याचा विसर्ग, पर्जन्यमान इत्यादींचा दैनदिन अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षास पाठवावा. धरणांवर वायरलेस यंत्रणा, पर्जन्यमापक यंत्र कार्यान्वित करावे. यंत्रणेने जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्षा मनीषा खत्री यांनी पाटबंधारे विभागास दिल्या...

Read More

‘हर घर दस्तक’ अभियानातंर्गत जुलै अखेरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच संभाव्य चौथ्या लाटेचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्याकरिता जिल्ह्यात 1 जून ते 31 जुलै, 2022 या कालावधीत ‘हर घर दस्तक’ अभियांनातंर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला अधिक गती देऊन जुलै अखेरपर्यंत  पहिला डोस राहिलेल्या नागरिकांचे 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.वि) कृष्णा राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीमती खत्री म्हणाल्या की, जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याकरिता लसीकरण न झालेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करावे. ज्या गावात 50 टक्क्यापेक्षा कमी लसीकरण झाले आहेत त्याठिकाणी लसीकरणास गती देवून 100 टक्के लसीकरण होईल. यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. त्यासाठी तालुकास्तरावर उद्दिष्ट देण्यात यावेत. तालुका व गावनिहाय लसीकरणासाठी शिल्लक लाभार्थ्यांची माहिती घ्यावी. लवकरच शाळा सुरु होत असल्याने 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे शाळेतच लसीकरण करावे. त्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन करावे. हर घर दस्तक मोहिमेतंर्गत विशेष शिबिर आयोजनाचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. लसीचा पहिला डोस घेणे प्रलंबित असलेल्या 4 लाख 56 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करावे. दुसरी मात्रा घेणे प्रलंबित असलेल्या 8 लाख 16 हजार लाभार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण करण्यात यावे. 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा (प्रिकॉशन डोस) देण्याचे काम पूर्ण करण्यात यावे. त्यासाठी लसीकरण प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या यादीनुसार...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!