Author: Ramchandra Bari
स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे सॅलरी पॅकेज अंतर्गत क्लेमचे मृताच्या वारसाला हस्तांतरण
Posted by Ramchandra Bari | Jun 9, 2022 | इतर |
नंदुरबार (प्रतिनिधी) – स्टेट बँक ऑफ इंडिया नंदुरबार शाखेत पगार खाते असलेल्या मृत कर्मचाऱ्याच्या नातलगांना वलेम रकमेचे वितरण मान्यवरांच्या उवस्थितीत करण्यात आले. कै चरणसिंग धुड्या गावित यांचे दुदैवाने दि ०२/१२/२०२१ रोजी दोंडाईचा – नंदुरबार रोडवर अपघाती निधन झाले. चरणसिंग हे रेल्वे पोलीस फोर्स दोंडाईचा येथे कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटूंबिय बँकेत खाते बंद करण्यासाठी आले असता स्टेट बँकेतील अधिकाऱ्यांनी हे खाते सॅलरी पॅकेज अंतर्गत असल्याने त्याला विभा संरक्षण असते, अशी माहिती त्यांना दिली व त्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांच्या वारसांनी कागदपत्रे आणली असता त्यांना सॅलरी पॅकेज या योजनेअंतर्गत रु .30,00,000 ( रु . तीस लाख मात्र...
Read Moreपटेलवाडी परिसरात एका घरात सापडला सुगंधित गुटखा,6 लाखाचा मुद्देमाल जप्त
Posted by Ramchandra Bari | Jun 8, 2022 | क्राईम, व्हिडीओ |
विभागीय लोकशाही दिनाचे 13 जून रोजी आयोजन
Posted by Ramchandra Bari | Jun 8, 2022 | दिनविशेष |
नाशिक (विमाका वृत्तसेवा):विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे 13 जून,2022 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त (महसुल) गोरक्षनाथ गाडीलकर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. राज्य शासनाच्या आदेशान्वये निर्बंध उठविण्यात आलेले आलेले आहे. तथापि सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने नागरिकांना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवण इत्यादींबाबींचे अनुकरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच विभागीय लोकशाही दिन विभागातील दहा विभाग प्रमुखांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त श्री. गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले...
Read Moreनंदुरबार येथे आज पासून ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
Posted by Ramchandra Bari | Jun 8, 2022 | व्यापार उद्योग |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नंदुरबार याचेमार्फत 9 ते 10 जून 2022 रोजी ऑनलाईन पद्धतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी. नोंदणी न केलेल्यांनी शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन पोर्टलवर लॉगीन करावे. त्यानंतर आपल्या नोंदणीच्या माहितीतील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर मधील दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील नंदुरबार जिल्हा निवडून त्यातील रोजगाराची माहिती पहावी व रिक्तपदांची माहिती पाहून नोंदणी करावी. त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होईल. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या 02564-295801 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. या मेळाव्याचा इच्छुक उद्योजक आणि बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त वि.रा. रिसे यांनी केले...
Read More