Author: Ramchandra Bari

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  अपर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे यांनी  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये  17 जून 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून  1 जुलै 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

वृद्धाश्रमांना माहिती सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात चालवित असलेल्या  वृद्धाश्रम संस्थांनी त्यांची माहिती  21 जून 2022 पर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी,‍ जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या कार्यालयात सादर करावी. सदर वृद्धाश्रमांची माहिती शासनास सादर करण्यात येणार असून या माहितीच्या आधारे नोंदणीकृत वृद्धाश्रमांना भविष्यात विविध योजनांचा लाभ देणे यामुळे शक्य होणार आहे. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी.नांदगांवकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले...

Read More

महिला लोकशाही दिनाचे 20 जून रोजी आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 20 जून 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. महिला लोकशाही दिनात तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक आणि आस्थापना विषयक बाबींच्या विषयावरील अर्ज महिला लोकशाही दिनी स्विकारले जाणार नाहीत. महिला लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी तक्रार अर्ज घेवून 11 वाजेपर्यंत स्वत: उपस्थित  राहून सादर करावे. असे सदस्य सचिव, महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  यांनी कळविले...

Read More

शुभमंगल सामूहीक विवाह योजनेसाठी अर्ज सादर करावे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महिला व बाल विकास विभागामार्फत शुभमंगल सामूहीक विवाह योजना राबविण्यात येत असून खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय तसेच नोंदणीकृत स्वंयसेवी संस्थांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा माहिती व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. राज्य शासनाच्या विशेष पॅकेज मधून  जिल्ह्यातील नोंदणीकृत  स्वंयसेवी संस्थामार्फत सामूहिक विवाह योजना राबविण्यात येणार असून विवाह करणाऱ्या जोडप्यास 10 हजार व संस्थेस एका जोडप्यामागे 2  हजार अनुदान देण्यात येणार आहे. संस्थेने योजना राबवितांना कमीत कमी 5 वधू- वरांचा गट करणे आवश्यक राहील. तसेच नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दाम्पत्यांनाही या योजनेद्वारे 10 हजार रुपये लाभ देण्यात येईल. नोंदणीकृत संस्था, तसेच नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासगर्वीय दाम्पत्यांनी अधिक माहितीसाठी तसेच विहीत नमुन्यातील अर्जासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला,कक्ष क्र.226, टोकरतलाव रोड नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210047) वर संपर्क...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!