Author: Ramchandra Bari

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिव्यांग व जात प्रमाणपत्र सादर करावे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता सहावी नियमित व इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील अनुशेष भरण्याकरीता पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा 5 जून 2022 रोजी घेण्यात आली होती. दिव्यांग प्रवर्गातील अर्ज सादर करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी परिक्षा दिली अशा विद्यार्थ्यांनी 4 जुलै 2022 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा कार्यालयात मुळ दिव्यांग प्रमाणपत्रासह समक्ष हजर राहावे. तसेच अनुसूचित जमाती, आदिम जमातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेले जात प्रमाणपत्राचा दाखला घेवून यावे. असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!