आपत्ती काळात सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, प्रधान सचिव, वने तथा पालक सचिव वेणूगोपाल रेड्डी
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा प्रशासनाने येत्या मान्सून काळात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीची शक्यता लक्षात घेवून जिल्हा आपत्ती प्राधिकरणामार्फत चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे. अशाच प्रकारे नियोजन आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्व यंत्रणांनी सतर्क राहून करावे, जेणेकरुन जीवित व वित्तहानी टाळता येईल. अशा सूचना प्रधान सचिव, वने तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालक सचिव वेणूगोपाल रेड्डी यांनी दिल्या आहेत. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसामुंडा सभागृहात जिल्हा आपत्ती नियंत्रणाअंतर्गत करण्यात आलेल्या नियोजनाची आढावा बैठक पालक सचिव श्री. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर जिल्हाधिकारी महेश...
Read More