Author: Ramchandra Bari

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते ग्राहक सेवा केंद्रासह गोदामाचे उद्घाटन

नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) :  सरलकृष्ण शेतकरी उत्पादक कंपनी, वावद अंतर्गत ग्राहक सेवा केंद्र (CSC) व खतांच्या गोदामाचे नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रमोद पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. उमेश पाटील, कृषी विभागाचे तांत्रिक अधिकारी वसंत चौधरी, विजय मोहिते, श्री. शेळके, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र दहातोंडे, वरीष्ठ शास्त्रज्ञ पद्माकर कुंदे, ‘आत्मा’चे चंद्रकांत बागुल, सरलकृष्ण शेतकरी उत्पादक कंपनी, वावदचे मनोज पाटील, अशोक पाटील, संतोष पाटील, श्यामराव पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी...

Read More

नंदुरबार जिल्ह्यात 9 ऑगस्टपासून ‘स्वराज्य महोत्सव’ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी घेतला आढावा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सव राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांचा आढावा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे यंदा पूर्ण  होत असून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’निमित्त विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा, तालुका आणि ग्रामपातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येतील. त्यांचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. या महोत्सवांतर्गत जिल्हास्तरावर सर्व हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण करण्यात येईल. नगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभा होतील. जिल्ह्यातील अनामवीर, स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांची दुर्मिळ छायाचित्रे व त्यांच्या कार्याची माहिती गावात देण्यात येईल. स्वातंत्र्यकालिन माहिती, ऐतिहासिक ठिकाणांची माहिती संकलित करण्यात येईल. स्वातंत्र्य दिनी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येईल. या फेरीत आबालवृद्धांना सहभागी करून घेण्यात येईल. जिल्ह्याच्या मुख्यालयी 75 फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येईल. याशिवाय स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक संचलन करतील. शालेय, महाविद्यालयस्तरावर निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा घेण्यात येतील. जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी पदयात्रा काढण्यात येईल. याच महोत्सवाचा एक भाग म्हणून आजादी का अमृत महोत्सव ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येईल. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. जिल्ह्यातील पुरातत्वदृष्ट्या महत्वाच्या वारसास्थळांच्या स्वच्छतेसाठी मोहीम राबविण्यात येईल. संविधानस्तंभाची उभारणी, जिल्ह्याच्या मुख्यालयी शासनमान्य लामण दिवा लावणे आदी उपक्रम राबविण्यात येतील. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली विविध उपक्रम राबविण्यात येतील....

Read More

प्रत्येक विभागाने ‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी कृति आराखडा तयार करावा जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांची सूचना

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत 11 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत केंद्र सरकार व राज्य शासनातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे.  या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागाने आपला कृती आराखडा तयार करुन जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी आज दिले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, या महोत्सवाचे समन्वयक तथा जिल्हा पुनवर्सन अधिकारी (ससप्र) नितीन सदगीर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली पाटील, आगार व्यवस्थापक मनोज पवार, सहाय्यक निबंधक एस. जी. खैरनार, पोलिस निरीक्षक भरत जाधव, लेखाधिकारी मिलिंद सांगळे, शिक्षण विस्तार अधिकारी डी. एच. माळी, व्ही.व्ही. सोनार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असून या गौरवशाली पर्वानिमित्त आजादी का अमृत महोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्याचे केंद्र सरकारने निर्देश आहेत. नागरिकांच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायम रहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने देशभरात 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशभरात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरीकांना प्रोत्साहन द्यावे, यासाठी जिल्हा परिषद, नगरपालिका यांनी आपआपल्या क्षेत्रात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजनबध्द कार्यक्रमांची आखणी करावी. हा उपक्रम राबविताना भारतीय ध्वजसंहितेचे पालन होईल याकडेही...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!