Author: Ramchandra Bari

महिला लोकशाही दिनाचे 18 जुलै रोजी आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 18 जुलै 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. महिला लोकशाही दिनात तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक आणि आस्थापना विषयक बाबींच्या विषयावरील अर्ज महिला लोकशाही दिनी स्विकारले जाणार नाहीत. महिला लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी तक्रार अर्ज घेवून 11 वाजेपर्यंत स्वत: उपस्थित  राहून सादर करावे. असे सदस्य सचिव, महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  यांनी कळविले...

Read More

नंदुरबार येथे ” उज्ज्वल भारत -उज्ज्वल भविष्य” महोत्सवांचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): ऊर्जा मंत्रालय,भारत सरकार यांचेमार्फत आझादी का अमृत महोत्सवांतर्गत सोमवार 25 जुलै 2022 रोजी सकाळी 9 वाजता तहसिल कार्यालय, नंदुरबार येथे तसेच  आदिवासी विकास भवन, तळोदा येथे दुपारी 2 वाजता ” उज्ज्वल भारत -उज्ज्वल भविष्य” महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांत ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार मार्फत मागील ८ वर्षात ऊर्जा विभागामार्फत राबविलेल्या विविध विकास योजनांच्या माहिती व जनजागृती या महोत्सवात देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत...

Read More

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दुर्गम भागात जावून नागरिकांशी साधला संवाद पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही केली पाहणी

नंदुरबार जिमाका वृत्तसेवा): नंदुरबार जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू आहे. जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग म्हणजे सातपुडा पर्वताच्या रांगेत पावसाची तीव्रता अधिक आहे. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर आला असून ते ओसंडून वाहत आहेत. या भागात पावसामुळे झालेले नुकसान समजून घेण्यासाठी आदिवासी बांधवांशी संवाद साधत त्यांना दिलासा देण्यासाठी पाणी-पावसाची तमा न बाळगता नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री थेट दुर्गम भागात पोहोचल्या. त्यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधत जिल्हा प्रशासन तुमच्यासोबत असल्याचा त्यांनी संदेश दिला. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी दाखविलेल्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे घरे,...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!