Author: Ramchandra Bari

अभिजित गिरासे याचे सुयश

नंदुरबार (प्रतिनिधी) : दोंडाईचा येथील अहिंसा तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी अभिजित भास्कर गिरासे याने बांधकाम पदविका या अभ्यासक्रमात तृतीय वर्षात यश संपादन केले असून त्यास ७४ टक्के गुण मिळाले असून त्याने घवघवीत यश संपादन केले आहे.अभिजित गिरासे हा नंदुरबार येथील लक्ष्मीनारायण नगरमधील रहिवासी तथा दै.’पुण्यनगरी’चे भास्कर गिरासे व संगिता गिरासे यांचा मुलगा आहे. अभिजित याचे शिक्षण नंदुरबार येथील चावरा इंग्लिश मिडीयम येथे झाले आहे. दरम्यान, शालेय जीवनात अबॅकस या गणितातील परीक्षेत त्याने गोल्ड मेडल मिळविले आहे. पुढे बांधकाम क्षेत्रात पदवी करुन त्यात करीयर करण्याचा त्याचा मानस आहे.त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत...

Read More

शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक पिकाची उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करुन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या पीक स्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे कृषि आयुक्तालयाचे कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण ) विकास पाटील यांनी केले आहे. खरीप हंगामासाठी भात,ज्‍वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, सोयाबीन, भुईमुग,  सुर्यफुल,  मुग व उडीद या 11 पिकांचा समावेश करण्यात आला आहे.तालुक्यामध्ये ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र 1 हजार हेक्टर हून अधिक आहे अशा सर्व पिकांकरिता पीकस्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून भाग घेण्यासाठी रुपये 300 प्रति शेतकरी प्रति पिक या प्रमाणे प्रवेश शुल्क असेल.             एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. यापूर्वी जिल्हाभर राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते आता ते काढून केवळ तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार त्याची तालुका पातळीवर निवड केली जाणार आहे. मागील दोन वर्षात ज्‍या शेतकऱ्यांची तालुका पातळीवर प्रथम  दोन क्रमांक आलेले शेतकरी जिल्‍हा पातळीवर पिकस्‍पर्धेमध्‍ये भाग घेण्‍यास पात्र असतील. तालुका व जिल्‍हा पातळीवरील पिकस्‍पर्धा स्‍वतंत्र होणार आहे. खरीप  हंगामासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख  मुग व उडीद पिकासाठी 31 जुलै 2022 व इतर पिकामध्‍ये भात, ज्‍वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर,  सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या पिकांसाठी 31 ऑगस्‍ट 2022 आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन कृषि विभागामार्फत...

Read More

शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग यांच्या अधिपत्याखालील नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघू प्रकल्प, बंधारे, अधिसूचित नदी-नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरू झालेल्या खरीप हंगाम 2022-2023 साठी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत पाणी अर्ज सादर करायचे आहेत.           सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजूरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आली असून मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरी बाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजूरी, ना मंजुरीचा विचार करण्यात येईल.             मंजूरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा,डाळी, कपाशी, भुईमूंग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी दरसाल दर शेकडा 10 टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळ्या नसताना पाणी घेणे, मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे, विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे आदी प्रकाराबाबत नियमानुसार पंचनामे करून दंडाच्या दराने आकारणी करण्यात येईल.             टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेण्यात यावी. शासनाने काही सवलती दिल्यास त्याबाबत कळविण्यात येईल. लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!