Author: Ramchandra Bari

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): मा. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार  मतदार नोंदणी नियम 1960 मध्ये सुधारणा केली असून मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी आता प्रत्येक वर्षाकरीता दिनांक 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर या अर्हता दिनांकवर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आगाऊ अर्ज सादर करु शकतील. मतदार यादी पुर्व- पुनरीक्षण कार्यक्रम असा: गुरुवार 4 ऑगस्ट, 2022 ते 24 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणिकरण करणे,दुबार, समान नोंदी, एका पेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रृटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदारयादीत सुधारणा करो, विभाग,भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्रांच्या सीमांचे पुनर्रचना तयार करुन, मतदान केंद्राच्या यादीला मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्याचा कालबध्द योजना आखण्याचा कार्यक्रम करण्यात येईल. मंगळवार 25 ऑक्टोंबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत नमुना 1 आठ तयार करुन 1 जानेवारी 2023  या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रीत प्रारुप यादी तयार करण्यात येईल. मतदार पुनरिक्षण  कार्यक्रम : बुधवार 9 नोव्हेंबर 2022 रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तर 9 नोव्हेंबर 2022 ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येईल. दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दिवशी विशेष मोहिम राबविण्यात येईल. 26 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकालात काढण्यात येईल. तर मंगळवार 3 जानेवारी...

Read More

ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप सुरु शेतकऱ्यांनी नवीन ॲप डाऊनलोड करावे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये काही महत्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल अॅप व्हर्जन-2 विकसित करण्यात आलेले आहे. हे सुधारित मोबाईल अॅप 1 ऑगस्ट 2022 पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी नवीन सुविधायुक्त ई-पीक ॲप डाऊनलोड करुन खरीप हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाचा ई-पीक पाहणी हा महत्वकांक्षी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येत असून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला 1 वर्ष पूर्ण झाले...

Read More

एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

 नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2022 (एमएचटी-सीईटी) 5 ऑगस्ट 2022 ते 20 ऑगस्ट 2022  या कालावधीत घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार  परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी सामायिक परीक्षा 2022-2023 ही डी.एन.पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शहादा (लोणखेडा परिसर) या केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने सकाळी व दुपारी या दोनसत्रात घेण्यात येणार आहेत. या कालावधीत परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात सकाळी 7-00 वाजेपासून ते संध्याकाळी 6-00 वाजेपर्यंत कोणीही प्रवेश करु नये. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीत  बंद ठेवण्यात यावेत, असे ही आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

जिल्ह्यात राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण पाहणीच्या 79 व्या फेरीस सुरूवात; अचूक माहिती देवून नागरिकांनी राष्ट्रीय कामास सहकार्य करावे, :जिल्हा सांख्यिकी अधिकारी अशोक पाटील यांचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत असलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 79 व्या फेरीच्या क्षेत्र कामास नंदुरबार जिल्ह्यात सुरूवात करण्यात आली आहे. या पाहणीच्या अनुषंगाने आपल्या कुटुंबास भेट देणाऱ्या कर्मचाऱ्यास अचूक व आवश्यक ती संपूर्ण माहिती देऊन  या राष्ट्रीय कामास सर्व क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, पोलीस पाटील, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे विविध पदाधिकारी व स्थानिक कर्मचारी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी  अशोक पाटील यांनी केले आहे. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या कक्षेत येणाऱ्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या निर्देशानुसार हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा कालावधी जुलै 2022 ते जून, 2023 असा असणार आहे. हा कालावधी प्रत्येकी 3 महिन्यांच्या 4 उप फेऱ्यांमध्ये विभागलेला असून हे सर्वेक्षण नागरी आणि ग्रामीण भागात सुरू झाले आहे. राज्यात 516 ग्रामीण व 912 नागरी वस्ती समुह घटकांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. यापैकी नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण भागात 20 आणि नागरी भागात 30 वस्ती समूहांची निवड करण्यात आली आहे. या पाहणी अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षेत्र काम सुरू झाले असून अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे कर्मचारी माहिती संकलनासाठी त्यांना निवडून दिलेल्या वस्ती समूहास (नागरी किंवा ग्रामीण) प्रत्येक कुटुंबांस प्रत्यक्ष भेट देऊन प्राथमिक माहिती  प्रश्नावलीच्या आधारे नोंदवून घेणार आहे. त्यानंतर त्या वस्तीतील अथवा नागरी समूहातील निवडक कुटुंबाची अधिकची माहिती संकलित करणार आहे. हे राष्ट्रीय महत्वाचे काम असल्याने सर्व क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, पोलीस...

Read More

नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे जिल्हावासीयांना आवाहन

नंदुरबार, दि.4 (जिमाका वृत्तसेवा): भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’, तर 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपले घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा, सर्व दुकाने, आस्थापनांनी या उपक्रम स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज दुपारी पत्रकार परिषदेचे...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!