नवोपक्रमशील शिक्षकांचे कार्य उल्लेखनीय उपजिल्हाधिकारी श्रीमती ठुबे यांचे प्रतिपादन
नंदुरबार (प्रतिनिधी)- अध्यापन कार्यात नवनवीन संकल्पनांचा वापर करून नवोपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांचे कार्य नक्कीच उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार उपजिल्हाधिकारी (ससप्र) श्रीमती कल्पना ठुबे यांनी काढले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व नंदुरबार जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवोपक्रम स्पर्धेतील विजेत्या शिक्षकांना पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या.शालेय अध्ययन अध्यापन कार्यात शिक्षकांनी विविध नवीन उपक्रमांचा सहभाग करून अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांसाठी ते उपयुक्त ठरते, ही बाब लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरावर शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेत...
Read More