रक्तामधील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी फोर्टिफाईड तांदुळ महत्वपूर्ण अपर जिल्हाधिकारी महेश पाटील
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : थॅलेसेमिया, सिकलसेल, ॲनिमिया या आजारांसाठी उपयुक्त असलेल्या फोर्टीफाईड तांदुळाविषयी जनसामान्यांना उद्भवलेल्या शंकाचे निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित कार्यशाळा आज संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, भारतीय खाद्य निगमचे उपमहाप्रबंधक अर्धदिपराय, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. एम. बावा, केंद्र शासनाच्या अन्न मंत्रालयाचे एस.ओ अविक भट्टाचार्य, सलीम दिवाण, स्टेट लिडर निलेश गंगावरे आदी उपस्थित होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले की, फोर्टिफाईड तांदुळाची माहिती जनसामान्यांना व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग, जिल्हा...
Read More