Author: Ramchandra Bari

वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत  वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण ही योजना पाण्याचा साठा निर्माण करणे व साठविलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने 50 टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येत असून ज्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केले आहे अशा पात्र शेतकऱ्यांनी  लाभ घेण्यासाठी  https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. अधिक माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले...

Read More

सामूहिक शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सामुहिक शेततळे पिकांसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे व दुष्काळी भागामध्ये फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने 100 टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक असून पात्र शेतकऱ्यांना 34x34x4.70 आकारमानासाठी 2 हेक्टर ते 5 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी 3 लाख 39 हजार रुपये अनुदान  तर 24x24x4.00 आकारमानासाठी  1 हेक्टर ते 2 हेक्टर क्षेत्रासाठी 1 लाख 75 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल. तरी या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. अधिक माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी कळवले...

Read More

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी  https://mahadbtmahait. gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे.या घटकांत विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकु, संत्रा, मोसंबी या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लाभ देण्यात येणार आहे. फुले घटकांत कट फ्लॉवर्ससाठी अल्प भूधारक शेतकऱ्यास 1 लाख प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार प्रति हेक्टर अनुदान तर इतर शेतकरऱ्यास एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 25 हजार प्रति हेक्टर अनुदान देण्यात येईल. कंदवर्गीय फुलेसाठी अल्प भूधारक शेतकऱ्यास 1 लाख 50 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमान 60 हजार प्रति हेक्टर अनुदान तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 37 हजार 500 प्रति हेक्टर अनुदान देण्यात येईल. तर सुटी फुलेसाठी अल्प भूधारक शेतकऱ्यास 40 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 16 हजार प्रति हेक्टर अनुदान तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 10 हजार प्रति हेक्टर अनुदान देण्यात येईल.  मसाला पिक लागवड घटकांत बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिकासाठी शेतकऱ्यास 30 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 12 हजार प्रति हेक्टर अनुदान तर बहुवर्षीय मसाला पिकासाठी शेतकऱ्यास 50 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!