Author: Ramchandra Bari
कमलाबाई अजमेरा अध्यापक विद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत
Posted by Ramchandra Bari | Sep 23, 2022 | व्हिडीओ, शैक्षणिक |
निवृत्ती वेतनधारकांसाठी त्रैमासिक मेळाव्याचे आयोजन
Posted by Ramchandra Bari | Sep 23, 2022 | इतर |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : निवृत्ती वेतनधारकांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्तीवेतन धारकांसाठी शुक्रवार 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता निवृत्ती वेतनधारकांचा त्रैमासिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व राज्य निवृत्ती वेतनधारकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे. तसेच 80 वर्षांवरील राज्य शासकीय निवृत्तीवेतन,कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी या मेळाव्यात येतांना आपल्या वयाबाबतचा पुरावा कोषागार कार्यालयात जमा करावा. असे जिल्हा कोषागार अधिकारी दे.ना.पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले...
Read Moreकृषि पुरस्कार 2021 साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
Posted by Ramchandra Bari | Sep 23, 2022 | कृषी, शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत राज्याचे महामहिम राज्यपाल यांचे हस्ते विविध कृषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे 2021 साठी कृषी विभागामार्फत नाशिक विभागातील शेतकऱ्यांकडून वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार आणि जिजामाता कृषिभुषण पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार हा कृषी विभागामार्फत कृषी क्षेत्रात संघटनात्मक आणि अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास देण्यात येतो. तर जिजामाता कृषिभुषण पुरस्कार हा कृषि क्षेत्रात अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शेतकऱ्यास देण्यात येतो. पुरस्कारांचे स्वरूप 50 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह व सपत्नीक/पतीसह सत्कार. देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या – 8 (प्रत्येक कृषि विभागातुन 1 याप्रमाणे ) पुरस्कारासाठीचे निकष – प्रस्तावित शेतकरी यांना केंद्र किंवा राज्य शासनाचा कोणताही कृषी पुरस्कार प्राप्त झालेला असावा. शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर शेती असावी आणि कुटुंबीयांसह त्याचा शेती हा मुख्य व्यवसाय असावा. प्रस्तावित शेतकरी यशस्वी उत्पादन, रोपवाटिका, सेंद्रिय शेती निविष्ठा उत्पादन व वापर, काढणी पश्चात व्यवस्थापन, साठवणूक व मूल्यवर्धन, कृषि प्रक्रिया, निर्यात इत्यादी कार्यात सहभागी होऊन परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा असावा. शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 3 वर्ष असावे. संबंधित शेतकरी केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसावा तसेच सेवानिवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारा नसावा. प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे 7/12 व 8 अ चा उतारा. केंद्र/राज्य शासकीय/ निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसलेबाबत तसेच सेवानिवृत्ती...
Read Moreकृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पासाठी अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
Posted by Ramchandra Bari | Sep 23, 2022 | कृषी, शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कृषि विभागामार्फत अन्नधान्य व फलोत्पादन पिकांच्या मूल्य साखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्था व संस्थात्मक खरेदीदार यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे. सदर प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात यापूर्वी 7 समुदाय आधारित संस्थांना राज्यस्तरावरून प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी 15 समुदाय आधारित संस्थांच्या मंजुरीचा लक्षांक निश्चित करण्यात आला असून नवीन प्रकल्पांना मंजुरीसाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी (FPO/ FPC) यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थांमध्ये प्रकल्पाच्या प्राथमिक अटी पूर्ण करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन यांचा समावेश आहे. प्राप्त अर्जांपैकी स्पर्धात्मक व उत्कृष्ट अर्जांना प्रकल्पाचे मंजूर समुदाय आधारित संस्थांना मंजूर प्रकल्प आराखड्याच्या किंमतीनुसार अन्नधान्य पिकांसाठी 60 टक्के अनुदान दराने 2 कोटी तर फलोत्पादन पिकांसाठी 60 टक्के अनुदान दराने 3 कोटी इतके अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना याबाबतची माहिती https://www.smart-mh.org या संकतेस्थळावर व ‘आत्मा’ च्या नंदुरबार कार्यालयात उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्ह्याचे नोडल अधिकारी प्रदीप लाटे (9420408041) किंवा पुरवठासाखळी व मुल्यसाखळी तंज्ञ (9403383524 ) यांच्याशी संपर्क साधावा किंवा जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत...
Read More