Author: Ramchandra Bari

शिक्षकांसाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची सुवर्णसंधी

नंदुरबार (प्रतिनिधी) राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांच्या कल्पकतेला व सुजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, शिक्षकांसाठी ही सुवर्णसंधी असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जे. ओ. भटकर, शिक्षणाधिकारी (प्राथ) श्री. सतिष चौधरी यांनी केले आहे.दरवर्षी राज्य शासनाच्या शिक्षण विभागातर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2022-23 या स्पर्धेचे आयोजन पाच गटांमध्ये करण्यात आले आहे. त्यात पहिला गट पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/ सेविका व पर्यवेक्षिका यांच्यासाठी तर दुसरा गट प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक, तिसरा गट माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी, गट क्रमांक चार विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल आणि गट क्रमांक पाच अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता) अशा प्रकारे पाच गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नवोपक्रमशील अधिकारी शिक्षक/ अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांनी HTTPS://every maha.ac.in/innovation/ या लिंक वर दिनांक 2 नोव्हेंबर ते दिनांक 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आपले अहवाल सादर करावेत. या स्पर्धेबाबतचे माहिती पत्रक या लिंकवर देण्यात आले आहे, त्याचे काळजीपूर्वक वाचन करावे. या स्पर्धेसंबंधित काही अडचणी अथवा शंका असल्यास जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथील वरिष्ठ अधिव्याख्याता तथा विभाग प्रमुख श्री. प्रविण चव्हाण 7743864703, उपविभाग प्रमुख तथा अधिव्याख्याता श्री. पंढरीनाथ जाधव 9370031233, विषय सहायक श्री देवेंद्र बोरसे 9168232256 यांच्याशी संपर्क साधावा.नंदुरबार जिल्हातुन या राज्यस्तरीय नवोपक्रम...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!