लोकसेवा हक्क कायद्यामुळे नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार; सर्व यंत्रणांनी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, चित्रा कुलकर्णी
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमान्वये नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असून या कायद्याची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम 2015 च्या अधिनियमासंदर्भात अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, नाशिक राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे उपसचिव सुनिल जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे अधिक्षक प्रशांत घोडके आदी उपस्थित होते. श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या की, राज्यातील नागरिकांना पारदर्शक व कार्यक्षमतेने...
Read More