Author: Ramchandra Bari

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या नंदुरबार जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी श्री सतीष काटके यांची नियुक्ती

नंदुरबार (प्रतिनिधी) – ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या नंदुरबार जिल्हा युवक आघाडीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री सतीष काटके यांची निवड करण्यात आली आहे.सामाजिक कार्याची आवड असलेले श्री सतीष काटके हे समाजाचे हित जोपासण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सतत योगदान देत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री प्रवीण काकडे यांच्या आदेशान्वये नाशिक विभागीय युवक आघाडी अध्यक्ष श्री शेखर कुवर यांच्या वतीने त्यांना सदरचे नियुक्त पत्र देण्यात आले आहे. ऑल इंडिया धनगर समाज महासंघ ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून उत्तर महाराष्ट्रातही या संघटनेने जोरदार घौडदौड उभारत संघटना वाढवली आहे.संघटनेच्या वतीने श्री...

Read More

पदवीधर निवडणूकीसाठी मतदान नोंदवतानाच्या खबरदारी बाबत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिंक  निवडणुकीसाठी सोमवार 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान होत असल्याने मतदारांनी आपले मत कसे नोंदवावे, याबाबतची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. पदवीधर निवडणुकीमध्ये मत कसे नोंदवाल..  मत नोंदविण्यासाठी आपल्याला मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केचपेनचाच वापर करावा. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपॉइंट पेन वापरू नका. आपण निवडलेल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढील ‘पसंतीक्रम नोंदवा’ या रकान्यात ‘१’ हा अंक लिहून मत नोंदवा.  एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून द्यायचे असले तरी ‘१’ हा क्रमांक एकाच उमेदवाराच्या नावापुढे नोंदवावा.  निवडून देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या संख्येइतके पसंतीक्रमांक आपणांस उपलब्ध आहेत. उरलेल्या उमेदवारांकरिता आपल्या पसंतीक्रमानुसार पुढील पसंतीक्रमांक अनुक्रमे  २, ३, ४, इ. नोंदवावेत.  कोणत्याही उमेदवाराच्या नावापुढे केवळ एकच अंक नोंदवा. एकच अंक एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावापुढे नोंदवू नका.  पसंतीक्रम केवळ अंकांमध्येच नोंदवावेत, जसे की,-१, २, ३, इ. पसंतीक्रम एक, दोन, तीन, इ. असे अक्षरी नोंदवू नका.  अंकांच्या आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये , जसे की,- १, २, ३,  इ. किंवा रोमन लिपीमध्ये , जसे की,- I, II, III, इ. किंवा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये मान्यता दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेच्या लिपीमध्ये पसंतीक्रमांक नोंदविता येतील. (अंक कोणत्याही एकाच लिपीत नोंदवावा )  मतपत्रिकेवर स्वाक्षरी करू नका, आद्याक्षरे लिहू नका, आपले नाव लिहू नका किंवा कोणताही शब्द लिहू नका. तसेच, मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नका.  तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी  ‘’ किंवा ‘’ अशा खुणा करू नका. अशा खुणा केलेल्या...

Read More

आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र भरण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग आस्थापना, व्यापारी, व्यावसायिक, कारखाने यांनी माहे ऑक्टोंबर 2022 ते माहे डिसेंबर,2022 या कालावधीत कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 दि.15 फेब्रुवारी,2023 पर्यंत सादर करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.  सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा 1959 अनुसार सर्व आस्थापनांनी मनुष्यबळाची त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. आस्थापनांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नियोक्ता या ऑप्शनवर क्लिक करुन आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने आपल्या आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती भरावी. माहिती न भरल्यास आस्थापनावर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड, तळ मजला रुम नं.27, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564- 295801) येथे संपर्क साधावा, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.रिसे यांनी कळविले...

Read More

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023: मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे मतदान 30 जानेवारी,2023 रोजी होणार आहे.या द्विवार्षिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. हे पुरावे असणार ग्राह्य 1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) भारतीय पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे  मुळ प्रमाणपत्र 10) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!