लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी सजग राहून मतदान करावे – जिल्हाधिकारी मनीषा खत्री
नंदुरबार,दि.25 जानेवारी,2023 (जिमाका वृत्तसेवा): लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी सजग राहून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात बिरसा मुंडा सभागृह येथे आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शाहूराज मोरे, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुंबे, तहसिलदार उल्हास देवरे, भाऊसाहेब थोरात, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, नायब तहसिलदार रिनेश गावीत, आशा सोनवणे आदी उपस्थित होते. श्रीमती खत्री म्हणाल्या की, लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक निवडणूक प्रक्रियेत सर्व मतदारांनी मतदान करणे आवश्यक आहे. यासाठी नव युवकांनी स्वत:हुन जास्तीत जास्त मतदान नोंदणी करावी. मतदान नोंदणी व मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व नागरिकांनी मतदान...
Read More