Author: Ramchandra Bari

राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट क्रमांक 74 वरील वाहतूक बंद

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):रेल्वे लाईन दुरुस्तीच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट नंबर 74 कि.मी.114/28-30 या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक 10 फेब्रुवारी,2023 सकाळी 8 पासून ते 14 फेब्रुवारी, 2023 रोजी सांयकाळी 20-00 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. या  कालावधीत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रेल्वे गेट क्रमांक 73 कडून वळविण्यात येत आहे. उक्त मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने सदर कालावधीत काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही, यासाठी पोलीस विभागाने रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधुन यामार्गावरील वाहतूक वळविण्याबाबत कार्यवाही करावी. असेही आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये 22 फेब्रुवारी,2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. नंदुरबार जिल्ह्याकरीता वर्ष  2022-23 या आर्थिक वर्षासाठी  लाभार्थींना थेट कर्ज योजनेत लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील व्यक्तींना या योजनेद्वारे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. योजनेचे स्वरुप प्रकल्प या योजनेत मुल्य रूपये एक लाख असून महामंडळाचा सहभाग 85 टक्के तर अर्जदाराचा सहभाग  5 टक्के राहील. यासाठी व्याज दर 4 टक्के असून परतफेडीचा कालावधी 3 वर्ष इतका राहील. पात्रतेचे निकष अर्जदार हा मातंग समाज व तत्स्मम 12 पोटजातीतील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षपेक्षा जास्त नसावे. अर्जदार या जिल्ह्याचा रहिवासी असावा, त्याचे सबिल क्रेडीट स्कोअर 500 असावे. अर्जदाराने या महामंडळाकडून यापुर्वी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षीक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा. अर्जदारास महामंडळाच्या नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे, प्रमाणपत्रे, कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. या योजनेत साधारणपणे पुरुष व महिला 50 टक्के आरक्षण राहील तसेच राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कृत व्यक्ती, सैन्यदलातील वीरगती प्राप्त झालेल्यांच्या वारसातील एका सदस्यास प्राधान्य देण्यात येईल. अर्जदारास कर्जमंजुरी व वितरणापूर्वी त्याच्या वारसदाराचे बंधपत्र द्यावे लागेल. अर्जदाराकडून कर्जमंजुरी नंतर कर्ज वितरणापूर्वी 2 जामिनदार एक नोकरदार लागेल, त्याच्या कार्यालयाकडील विभाग,...

Read More

यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांची माहिती

 नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):मराठी भाषेतील उत्कृष्ट  वाड्मय  निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करीता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका पाठविण्यास २ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेच्या नियमावलीतील नियम क्रमांक २४ मध्ये बदल करण्यात आला असून या नियमात ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य वगळता इतरांना या पुरस्कारांसाठी पुस्तके सादर करता येतील’, अशी सुधारणा करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी दिली आहे. मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करीता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून), महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली व पणजी, गोवा येथे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात १ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत पाठविता येणार होत्या. मात्र, या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याच्या कालावधीस एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात आली असून आता या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक २ मार्च २०२३ असा आहे. २ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये गतवर्षीच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेच्या नियमावलीतील नियम क्रमांक २४ मध्ये बदल करण्यात आला असून या नियमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य वगळता इतरांना या पुरस्कारांसाठी पुस्तके सादर करता येतील, अशी सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारित नियमाची अंमलबजावणी सन २०२२ च्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेपासून करण्यात येत आहे. या योजनेची सन २०२२ च्या पुरस्कार स्पर्धेसाठीची...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!