Author: Ramchandra Bari

वार्षिक उद्योग पाहणी अहवालासाठी उद्योगांनी सहकार्य करावे; अर्थ व सांख्यिकी संचालनालय संचालक विजय आहेर

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): वार्षिक उद्योग पाहणी अहवालाची माहिती देण्यासाठी सर्व उद्योगांनी सहकार्य करावे. कामाचे योग्य नियोजन करून शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व अचूक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर यांनी केले.             अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई तर्फे यशदा, पुणे येथे राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे 19 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीत तीन दिवसीय कार्यशाळा नियोजन विभागाच्या अधिनस्त आयोजित करण्यात आले होते.             या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी यशदाचे महासंचालक, एस. चोकलिंगम, व प्रमुख पाहूणे म्हणून सौम्या चक्रवर्ती, उपमहानिदेशक औद्योगिक सांख्यिकी विभाग, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, कोलकाता, राष्ट्रीय...

Read More

ज्येष्ठ नागरिकांसाठी 14567 ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत 14567 क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या टोल फ्री हेल्पलाईनच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार इत्यादींची माहिती व मदत देण्यात येत आहे.             राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, राज्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याची ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्याद्वारे चालविण्यात येत आहे. ही हेल्पलाईन टोल फ्री स्वरुपात असून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!