‘शासन आपल्या दारी’ मोहिमेत कृषि विभाग देणार विविध योजनांचा लाभ
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): ‘शासन आपल्या दारी ’ अभियानाच्या माध्यमातून विविध विभागामार्फत जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने येत्या खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना आपल्या शेतीकरिता आवश्यक बाबींच्या खरेदीसाठी व शेतीकरीता पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी वेळीच अर्थसहाय्यासाठी जिल्ह्यात 15 जून 2023 पर्यंत विविध योजनांचा लाभ नियोजन केले आहे. कृषि विभागामार्फत बाह्य सहाय्यित प्रकल्प, विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. केंद्र पुरस्कृत योजनांचे वार्षिक कृति आराखडे अंतिम झाल्यानंतर केंद्र शासनाकडून वर्षभरात टप्याटप्याने निधी प्राप्त होतो. त्याचप्रमाणे, राज्य पुरस्कृत योजनांसाठी देखील वित्त विभागाकडून टप्याटप्याने निधी प्राप्त होतो. हा निधी टप्प्याटप्याने प्राप्त होत असला तरी कृषि क्षेत्राचे...
Read More