Author: Ramchandra Bari

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उप जिल्हाधिकारी कल्पना निळ- ठुबे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.  यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, नायब तहसीलदार  राजेंद्र चौधरी यांचेसह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित...

Read More

स्वस्त दरात मिळेल रेती,  घरकुलांना मिळेल गती !

नागरिकांना स्वस्त दरानं वाळू (रेती) मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा, या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं नवीन वाळू धोरण जाहीर केलं आहे. 1 मे पासून एकेकाळी 7,000 रुपयांना मिळणारी ट्रॅक्टरभर वाळू महाराष्ट्र राज्यात केवळ 600 रुपयांना मिळणार आहे. नवीन धोरणानुसार, सर्वसामान्य नागरिकांना 600 रुपये प्रती ब्रास किंवा 133 रुपये प्रती मेट्रिक टन इतक्या दरानं वाळू मिळणार आहे. वाळू वाहतुकीचा खर्च मात्र नागरिकांना करावा लागणार आहे. एखाद्या व्यक्तीला बांधकामासाठी वाळू हवी असल्यास वाळूची मागणी ऑनलाईन नोंदवता येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजना तसंच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी संबंधित अधिकाऱ्यानं सादर केलेली...

Read More

चंद्रकांत वळवी यांची मुख्य आयुक्त पदी निवड

नंदुरबार (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील खांडबारा येथील रहिवासी व नंदुरबार जिल्ह्यातून प्रथम सनदी अधिकारी होण्याचा मान पटकावलेले श्री चंद्रकांत रावजी वळवी यांची मुख्य आयुक्त (जीएसटी प्रिंसिपल कमिशनर) पदी बढती करण्यात आली आहे.गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे विक्री व सेवाकर उपमुख्य आयुक्त म्हणून कार्यरत असलेले श्री चंद्रकांत वळवी हे नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा तालुका नवापूर येथील रहिवासी असून. सर्वप्रथम आयकर निरीक्षक म्हणून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी सन 1991 मध्ये यश संपादन केले होते. त्यानंतर सनदी अधिकारी होण्याच्या ध्येयाने त्यांनी संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन त्यात यश संपादन केले. भारतीय महसूल सेवा संवर्गात विविध पदांवर त्यांनी यशस्वीपणे कारभार सांभाळला आहे. ते सध्या गुजरात राज्याचे...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!