वृक्षारोपणातून मानवी जीवनाकरीता आरोग्यदायी वातावरण निर्माण करावे -कृष्णा भवर
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): नागरिकांनी पर्यावरणाचे व निसर्गाचे रक्षण, संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवड करुन मानवी जीवनाकरीता आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उपवनसंरक्षक कृष्णा भवर यांनी केले आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक वनीकरण क्षेत्र, नंदुरबार अंतर्गत बंधारपाडा येथील रोपवाटीकेत तसेच जिल्हा कारागृह परिसर साक्री रोड, नंदुरबार येथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी ते श्री. भवर बोलत होते. यावेळी जिल्हा कारागृहाचे अधिक्षक आर. आर. देशमुख, जि.प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, सहायक वनसंरक्षक अमितराज जाधव, धनंजय पवार वरीष्ठ तुरुंगाधिकारी बी. डी. श्रीराव, वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती...
Read More