Author: Ramchandra Bari
рдЖрджрд┐рд╡рд╛рд╕реА рдкрд░реНрдпрдЯрди рдорд╣реЛрддреНрд╕рд╡рд╛рд╕рд╛рдареА рдЕрд░реНрдЬ рд╕рд╛рджрд░ рдХрд░рд╛рд╡реЗрдд
Posted by Ramchandra Bari | Jun 23, 2023 | рдЗрддрд░ |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): पर्यटन संचालनालय, नाशिक कार्यालयामार्फत, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आदिवासी पर्यटन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन नाशिक पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई -राठोड यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. उपसंचालक पर्यटन संचालनालय,नाशिक कार्यालयामार्फत नाशिक विभागत नाशिक,धुळे व नंदुरबार या जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी विविध कार्यक्रम व महोत्सवांचे आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक इच्छुक, अनुभवी व नोंदणीकृत संस्था, व्यक्ती, व कार्यक्रम व्यवस्थापकांनी बुधवार, 27 जून, 2023 पर्यंत पर्यटन भवन, शासकीय विश्राम गृह आवार, गोल्फ क्लब मैदानाजवळ, नाशिक संपर्क फोन नंबर 0253-2995464 येथे संपर्क साधावा, असे उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक श्रीमती. सरदेसाई- राठोड यांनी कळविले...
Read MoreрдЖрджрд┐рд╡рд╛рд╕реА рд╡рд┐рдХрд╛рд╕ рдкреНрд░рдХрд▓реНрдк рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдп рджреЗрдгрд╛рд░ рдкреЗрд╕рд╛ рдХреНрд╖реЗрддреНрд░рд╛рддреАрд▓ рд░рд╣рд┐рд╡рд╛рд╕реА рджрд╛рдЦрд▓рд╛ – рд╕рд╣рд╛рдпреНрдпрдХ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдзрд┐рдХрд╛рд░реА рдордВрджрд╛рд░ рдкрддреНрдХреА
Posted by Ramchandra Bari | Jun 23, 2023 | рдЗрддрд░ |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत दिला जाणार असल्याची असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या 29 ऑगस्ट,2019 रोजीच्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याची मान्यता मिळाली आहे. तरी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,तळोदा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव कार्यक्षेत्रातील सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्र (पेसा) रहिवासी दाखला प्रकल्प कार्यालयात रहिवासी दाखला मिळणार आहे. हा दाखला मिळण्यासाठी उमेदवारांनी तहसिलदारांचे अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधारकार्ड, स्वयंघोषणापत्र, उमेदवार राहत असलेला पाडा हा पेसा क्षेत्रात येत असल्याबाबतचे महसुल ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा शासकीय दुध डेअरीच्या मागे, शहादा रोड तळोदा, जि.नंदुरबार येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत,असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी श्री.पत्की यांनी केले...
Read MoreрдЧреЛрд╡рд░реНрдзрди рдЧреЛрд╡рдВрд╢ рд╕реЗрд╡рд╛ рдХреЗрдВрджреНрд░ рдпреЛрдЬрдиреЗрд╕рд╛рдареА 19 рдЬреБрд▓реИрдкрд░реНрдпрдВрдд рдЕрд░реНрдЬ рдХрд░рд╛рд╡реЗрдд -рдбреЙ.рдЙрдореЗрд╢ рдкрд╛рдЯреАрд▓
Posted by Ramchandra Bari | Jun 23, 2023 | рдЗрддрд░ |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेत पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.उमेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. गोवर्धन गोवंश सेवा केंद्र स्थापन करणेसाठी जिल्ह्यातील नवापूर वगळता इतर तालुक्यात गोवंश सेवा संस्थांकडून विहित नमुन्यातील अर्ज 19 जुलै, 2023 पर्यंत मागविण्यात आले आहेत. दुग्धोत्पादनास, शेतीकामास, पशुपैदाशीस, ओझी वाहण्याच कामास उपयुक्त नसलेल्या/ असलेल्या गाय,वळू, बैल व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणाऱ्या सेवा केंद्रासाठी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही नवीन योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेतंर्गत पात्र गोशाळांना पशुधनाच्या संख्येनुसार दोन टप्प्यात अनुदान देण्यात येईल. या योजनेसाठी नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, शहादा,तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील एका गोशाळांची निवड करण्यात येईल. योजनेच्या लाभ व पात्रतेच्या अटी, शर्ती व योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्जाचा विहित नमुन्यासाठी संबंधित तालुक्यातील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन किंवा पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय,नंदुरबार यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, डॉ.पाटील यांनी केले...
Read Moreрдордз рдХреЗрдВрджреНрд░ рдпреЛрдЬрдиреЗрд╕рд╛рдареА рдЕрд░реНрдЬ рд╕рд╛рджрд░ рдХрд░рд╛рд╡реЗ ┬а– рд╡рд┐рдЬрдп рдЪрд╛рдЯреА
Posted by Ramchandra Bari | Jun 23, 2023 | рд╢рд╛рд╕рдХреАрдп |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजनेसाठी पात्र व्यक्ती आणि संस्थानी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. मधकेंद्र योजना सुरू करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान स्वरुपात देण्यात येईल व 50 टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल. शासनाच्या हमी भावाने मध खरेदी करण्यासोबत मधमाशा संरक्षक व संवर्धन याबाबत मोफत प्रशिक्षण व जनजागृती मंडळामार्फत करण्यात येते. वैयक्तिक मधपाळ प्रशिक्षण घेणेसाठी अर्जदार साक्षर असावा आणि वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल. केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ योजनेसाठी मधपाळ संस्था, व्यक्तिंना प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदार किमान 10 वी पास असावा आणि वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदार व्यक्तींच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडे तत्वावर शेतजमीन असावी. लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्र चालक मधपाळ प्रशिक्षण संस्थेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे मालकीची किंवा 10 वर्षांसाठी भाडे तत्वावर 1 एकर शेतजमीन असावी. प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर 1000 चौ.फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावे. लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे आणि मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी संबंधीताना प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल. योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दुसरा मजला...
Read More