Author: Ramchandra Bari

वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव; विविध उपक्रमातून २५ वर्षांच्या उपलब्धी आणि भविष्याचा वेध घेणार पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार (जिमाका वृत्त) येत्या १ जुलैला  नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीस २५ वर्ष पूर्ण होत असून २०२३-२४ हे वर्ष जिल्ह्याचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून निरनिराळ्या उपक्रमातून जिल्ह्यातील गेल्या २५ वर्षातील उपलब्धी व भविष्याचा वेध घेतला जाणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल (नंदुरबार), मंदार पत्की (तळोदा),...

Read More

सोमवार 3 जुलै रोजी होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

नंदुरबार (जिमाका वृत्त) : जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी  सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे जून महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 3 जुलै, 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून तक्रार अर्ज सोमवार दि. 3 जुलै, 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित राहून सादर करावेत, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!