Author: Ramchandra Bari

रौप्य महोत्सवी वर्षाच्या वर्धापन दिनी 25 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करु या ! -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात पर्यावरणाचा समतोल राखून हरित नंदुरबार करण्यासाठी 25 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करु या, असे  प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते आज खांडबारा येथे नंदुरबार जिल्हाच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने नंदुरबार वनविभाग, मेवासी वनविभाग,तळोदा,विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते संपन्न झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित,जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, मेवासी वनविभाग,तळोदाचे उपवनसंरक्षक एल.एम.पाटील, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल,...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!