Author: Ramchandra Bari

फिरत्या विधी सेवा केंद्र व लोक अदालत वाहनाचा शुभारंभ

नंदुरबार (जिमाका वृत्त) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती औरंगाबाद यांच्या निर्देशान्वये नंदुरबार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालत वाहनाचा शुभारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. आर. एस. तिवारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. जिल्हा न्यायालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश 2, एम. आर. नातू, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.व्ही. हरणे, व्ही. एन. मोरे, सह दिवाणी न्यायाधिश (वरिष्ठ स्तर) श्रीमती वाय. के. राऊत, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) ए. आर. कुळकर्णी, एस. बी. मोरे, श्रीमती पी. एम. काजळे, नंदुरबार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. पी. बी. चौधरी, अॅड. कमलाकर साळवे, अॅड. एम. पी. चौधरी, अॅड. शेख लोक अभिरक्षक कार्यालयाचे अॅड. सिमा खत्री, अॅड. एच. यु. महाजन, अॅड. जी. आर. वसावे, अॅड. श्रीमती. शुभांगी चौधरी,  विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेतून फिरत्या लोक अदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील निवडक गावातील न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे या लोक अदालतीत तडजोडीने निकाली काढण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नागरिकांना लोक अदालत व विविध कायद्याची माहिती देऊन कायदेविषयक जनजागृती केली जाणार आहे. कार्यक्रमानंतर नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव या गावी कायदेविषयक शिबीर व विधी सेवेचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डि. व्ही. हरणे, यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती दिली. लोकअभिरक्षक कार्यालयाचे मुख्य...

Read More

जवाहर नवोदय विद्यालयायाच्या सहावीत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

नंदुरबार (जिमाका वृत्त) जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 2024 साठी 10 ऑगस्ट, 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय श्रावणीचे प्राचार्य पी. आर. कोसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.  प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर व नंदुरबार तालुक्यातील शासनमान्य शाळेतील इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असलेला (2023-24) असावा. विद्यार्थ्यांचा जन्म 01 मे 2012 पूर्वी व 30 जुलै 2014 नंतर झालेला नसावा.  विद्यार्थी हा 2021-22 ते 2023-24 मध्ये इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी उत्तीर्ण असावा. अनुसूचित जाती, जमाती आणि सर्व मुली, अपंग संवर्गासाठी व इतर मागास वर्गासाठी जागा राखीव आहेत, तसेच तृतीयपंथीय उमेदवारही निवड चाचणीसाठी अर्ज करु शकतील. निवड चाचणी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रियेतून सोपी केली असून परिक्षेसाठी डेक्सटॉप, लॅपटॉप, मोबाईल, टॅब याद्वारे नवोदय विद्यालय समितीच्या https://navodaya.gov.in/nvs/en/Home1 किंवा https://cbseitms.nic.in/ ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जासाठी आधार कार्ड, मुख्याध्यापकाचे पत्र, रहिवासी दाखला, फोटो, स्वाक्षरी आवश्यक आहे.             प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा शनिवार 20 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2023 आहे.    यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत. अधिक माहितीसाठी, एस.एन. जाधव मोबाईल क्र. 9404814281 विनोद पाटील मोबाईल क्र. 8830745576 यांच्याशी संपर्क साधावा असेही मुख्याध्यापक श्री. कोसे यांनी कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!