Author: n7news

कोरोनाचा वाढता विळखा; आठवडाभरात ८५ बाधित

नंदुरबार :- जिल्ह्यात आज आणखीन 06 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले असून, दिवसेंदिवस कोरोणा विषाणुचा विळखा जिल्ह्यात वाढतांना दिसुन येत आहे.  आता जिल्ह्यातील कोरोणा बाधीतांचा आकडा हा १६३ वर पोहचला आहे. यातील ०६ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून जवळपास ७० जण उपचारानंतर संसर्गमुक्त होवुन घरी परतले आहेत. आज आलेल्या अहवालांमध्ये नंदुरबार शहरातील साईबाबा नगर कोकणी हिल येथील ३७ वर्षीय पुरुष, वृदांवन कॉलनीतील ५० वर्षीय महिला,  सिद्धीविनायक चौकातील २८ वर्षीय महिला, तालुक्यातील धुळवद येथील ४७ वर्षीय पुरुष तर तळोदा शहरातल्या खांन्देश गल्लीतील ५३ वर्षीय पुरुष आणि शहाद्याच्या गणेश नगर मधील ४२ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. दुसरीकडे आजच १० जण कोरोणा विषाणु संसर्गमुक्त देखील झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील अॅटीव्ह रुग्णांची संख्या ही ८७ राहीली असून, यातील दोन जण धुळे तर एक जण नाशिक येथे उपचार घेत आहे.जिल्ह्यात आतापर्यत १९५२ जणांचे  नमुऩे तपासणीसाठी धुळे येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आलेले होते. यातील १७१८ अहवाल निगेटीव्ह आले असून ५४ अहवाल हे प्रलंबीत आहेत. या सरत्या आठवड्यामध्ये कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला असून, या आठवड्याभरातच ८५ नव्या कोरोणा विषाणु बाधीतांचे अहवाल पॉझीटीव्ह आले असून, त्यातच आता पावसाळा सुरु झाल्याने साथीचे आजार देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोणा विषाणुचे संकट आणि पावसाळा या साऱया परिस्थीतीत नागरीकांनी अधिक जागृत राहुन कुठलेही लक्षण आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेला संपर्क करण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडुन केले जात आहे. ...

Read More

प्रेम विवाह प्रकरण; ७ जणांना सश्रम कारावास

नंदुरबार:-  तळोदा येथील प्रेमविवाह प्रकरणातून तरुणाला मारहाण करणाऱ्या नातलगांना न्यायालयाने सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत प्राप्त माहितेनुसार या घटनेतील दुखापत झालेल्या तरुणाने आरोपी परिवारातील मुलीशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर आरोपी व दुखापती तरुण यांचे परीवारातील सदस्यांमध्ये जातीरीतीरीवाजाप्रमाणे बैठक बसवुन तंटा आपसात मिटवुन घेण्यात आला होता व मुलीस तिचे वडील यांचेकडे सोपविले होते. दरम्यान आरोपी हे संबंधित तरुणाला वारंवर जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यातच दि .०५  मे २००७ रोजी सकाळी ११.३० वाजताचे सुमारास तळोदा गावात साजन टेलर्स या दुकानासमोर अलीम मलिक हुसेन, सोहेब मलिक हुसैन सुलतान, मलक नईम मलक अफजल ( मयत ), मलक विकार मलक रहेमान, मलक रहीम मलक हुसेन, मलक सुलतान मलक हुसेन, मलक हसीम मलक अफजल आणि अहमदखान रहेमानखान पिंजारी सर्व रा . मलकवाडा तळोदा जि.नंदुरबार या सर्वांनी हातात लाकडी डेंगारे , लाठया काठया व लोखंडी चैन घेवुन अनिस ईस्माइल बागवान याने आपल्या मुलीसोबत प्रेम विवाह केल्याच्या रागातुन मारहाण केली होती. यात अनिस यांचे डोके फुटुन तो रक्तबंबाळ झाला होता. नंतर जखमी अनिस यास काही लोकांनी आरोपीतांच्या तावडीतुन सोडवुन त्यास उपचारकामी दवाखान्यात दाखल केले होते. याप्रकरणी अनिस याचा भाऊ रईस ईस्माइल बागवान याच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.   सदर खटल्याची सुनावणी  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री . एस . डी . हरगुडे यांच्या कोर्टात होवून आरोपी यांचेविरुध्द गुन्हा शाबित होवुन आरोपी क्र .३ मयत झाल्याने उर्वरित आरोपी क्र. १ ते २ व ४ ते ८ यांना न्यायालयाने ६ महिने...

Read More

सलून-ब्युटीपार्लर सुरू करण्यास परवानगी

नंदुरबार – ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत मुळ आदेशात करण्यात आलेली सुधारणा लक्षात घेता जिल्ह्यातील सलून दुकाने,  ब्युटी पार्लर आणि बार्बर शॉप सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आदेशान्वये परवानगी दिली आहे. या प्रकारच्या दुकानात केवळ केस कापणे, हेअर डाईंग, वॅक्सींग आणि थ्रेडींग इत्यादी सेवांना परवानगी असेल.  त्वचेसंबंधीत सेवांना परवानगी असणार नाही. याबाबत ग्राहकांना दिसेल असे फलक दुकानाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावेत. दुकानात काम करणाऱ्या कामगारांनी आणि कर्मचाऱ्यांनी संरक्षक साधानांच्या वापरासह ग्लोव्हज, ॲप्रोन आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. ग्राहकांना सेवा दिल्यानंतर सर्व दुकानातील  खुर्च्या निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. दुकानातील सामाईक भाग व फ्लोअरचे दर दोन दिवसांनी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. एकदाच उपयोगात येणारे (डिस्पोजेबल) टॉवेल किंवा नॅपकीनचा उपयोग ग्राहकांसाठी करणे आणि सेवा देण्यापूर्वी व सेवा दिल्यानंतर साधनांचे (नॉन डिस्पोजेबल) निर्जंतुकीकरण बंधनकारक आहे. या सर्व सुचना दुकानात ठळक अक्षरात लावण्यात याव्यात. आदेशाचा भंग झाल्यास संबंधिताविरुद्ध चौकशी अंती दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. हा आदेश नंदुरबार जिल्ह्याच्या संपूर्ण सीमा क्षेत्राकरिता लागू...

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात ईमेलद्वारे निवेदन स्विकारणार

नंदुरबार दि.27- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना किंवा अभ्यागतांना जिल्हाधिकारी किंवा अन्य अधिकाऱ्यांची भेट घेता येणार नाही. नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे निवेदन द्यावे, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आदेशित केले आहे. नागरिकांनी आपला अर्ज किंवा निवेदन [email protected] या ईमेलवर पाठवावे किंवा 8888137967 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे सादर करावे. या आदेशाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी पालन करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

शहरात कोरोना फैलावतोय; नवीन २२ पॉझीटिव्ह

नंदुरबार :- जिल्हा प्रशासनाला रात्री उशिरा प्राप्त अहवालांमध्ये जिल्ह्यात पुन्हा २२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या तब्बल २२४ वर जाऊन पोचली आहे. आज रात्री आलेल्या अह्वालांमध्ये २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रात्री उशीरा प्राप्त अहवालांनुसार पॉझीटिव्ह आढळुन आलेल्या बाधीतांमध्ये सरस्वती नगर नंदुरबार येथील १ पुरुष ४६, मंजुळा विहार कोकणी हिल येथील १ पुरुष ४२, देसाईपुरा नंदुरबार येथील २ पुरुश ३०,१३ पायल नगर, नंदुरबार येथील १ पुरुष ४४, चौधरी गल्ली येथील २ पुरुष ८०,५०, २ महिला ७६,४०, परदेशी पुरा येथील २ पुरुष ४१,२६, गांधी नगर येथील ३ पुरुष २५,२५,२६, रायसिंगपुरा १ पुरुष ६०, तर जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील ४ पुरुष ४,२७,४०,३३, १ महिला ४२ अशा ५ जणांचा समावेश आहे. त्याचबरोबर नवापुर तालुक्यातील खांडबारा येथील १ पुरुष ३८ व शहादा येथील गरीब नवाझ कॉलनी परिसरातील १ पुरुष ७२ यांचा यात समावेश...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!