कोविड लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन करा- डॉ.राजेंद्र भारुड
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात 16 जानेवारीपासून सुरु करण्यात येणारी कोविड लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे आणि त्यासाठी नोंदणी न झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी त्वरीत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरणाबाबत आयोजित प्रशिक्षणाच्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. विविध प्रकारच्या आरोग्य सुविधांची निर्मिती कोरोना काळात करण्यात आली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केले असून लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी...
Read More