Author: n7news

कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करावे – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या कोविड अनुरुप वर्तनाच्या अटी व शर्तींचे नागरिकांनी पालन करावे. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे. संपूर्ण लसीकरण आवश्यक नव्या नियमानुसार कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती, सर्व सेवा देणारे व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (खेळाडू, अभिनेते इत्यादी) कार्यक्रमस्थळी येणारे व्यक्ती, पाहुणे, ग्राहक याचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, मेळावे इत्यादी ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे. त्याबरोबर अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये...

Read More

पहारेकरी- सफाई कामगारपद मानधनावर भरण्याबाबत

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा सैनिक कार्यालय धुळे येथील बहुउद्देशिय हॉल येथे दरमहा  रुपये 8911 इतक्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने पहारेकरी- सफाई कामगारकरीता एक जागा भरावयाची आहे. हे पद माजी सैनिक मधून भरले जाणार आहे.  या पदासाठी इच्छुक माजी सैनिकांनी आपल्या वैयक्तीक बायोडाटा, तसेच सैन्यसेवेचे सेवापुस्तक तसेच शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रासह 19 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, माजी सैनिक विश्रामगृह आवार, संतोषी माता मंदिर चौकाजवळ, धुळे  येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले...

Read More

जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद  यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, बालाजी क्षीरसागर, बबन काकडे , महेश सुधळकर, तहसिलदार उल्हास देवरे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित...

Read More

विविध उपक्रमांद्वारे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करा- महेश पाटील

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  तालुका स्तरावर विविध उपक्रमांद्वारे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात यावा. या दिवशी चुनाव पाठशालासारखे मतदारांचे प्रबोधन करणारे उपक्रम आयोजित करण्यात यावे, असे अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी सांगितले. मतदार दिवसाच्या आयोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय बागडे तसेच जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. राष्ट्रीय मतदार दिवसापासून ई-एपिक सुविधा सुरू होत असून प्रातिनिधीक स्वरुपात मतदारांचे एपिक डाऊनलोड करणे व मोबाईल क्रमांकाची दुरुस्ती असल्यास ई-सुविधेद्वारे आवश्यक बदल करणे असे कार्यक्रम या दिवशी घेण्यात यावे. मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे श्री.पाटील यावेळी...

Read More

कोविड लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन करा- डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात 16 जानेवारीपासून सुरु करण्यात येणारी कोविड लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे आणि त्यासाठी नोंदणी न झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी त्वरीत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरणाबाबत आयोजित प्रशिक्षणाच्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. विविध प्रकारच्या आरोग्य सुविधांची निर्मिती कोरोना काळात करण्यात आली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केले असून लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!