नवापुरात 34 मजुर पोलिसांच्या ताब्यात
नवापूर (प्रतिनिधी) :- देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे. यातच सरकारने राज्य, जिल्हा बंदी केल्याने जे लोक ज्या ठिकाणी आहेत, त्याच ठिकाणी त्यांना ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. अशातच गुजरात राज्यातून रेल्वे रुळांच्या मार्गाने येणाऱ्या 34 मजुरांना नवापूरचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी ताब्यात घेऊन शहरातील सीमा तपासणी नाक्यावरील शेल्टर होम रवानगी करण्यात आली आहे.नवापूर परिसरातील स्थलांतरित मजुरांना राहण्यासाठी सीमा तपासणी नाक्यावरील इमारतीत राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. एका रूममध्ये चार मजूरांना संडास, बाथरूम, फॅन, लाईट पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. संग्रहित फोटो दरम्यान, मध्यप्रदेश राज्यातील मजूर गुजरात राज्यात मजुरीसाठी गेले होते. परंतु संपूर्ण देश लाॅकडाऊन असल्याने त्यांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांनी गावी जाण्याचे ठरवले. गावी जाण्यासाठी वाहतुकीचे साधन नसल्याने ते लोहमार्गाने गावाकडे मार्गस्थ झाले. हे सर्व मजूर नवापूर शहर हद्दीत आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांची शेल्टर होममध्ये रवानगी करण्यात आली आहे.लाॅकडाउन संपल्यानंतर या मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यात येईल, अशी माहिती नवापूरचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हरिश्चंद्र कोकणी, गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी त्यांच्या तपासणी करून घेतली. या मजुरांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नसून, त्यांना सीमा तपासणी नाक्यावरील शेल्टर होम कक्षात ठेवण्यात आलेले असल्याचे सांगण्यात...
Read More