Author: n7news

नंदुरबार पोलिंसाची सॅनिटायझेशन व्हॅन

नंदुरबार(प्रतिनिधी) :- जिल्हा पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागाने सॅनिटराझर व्हँनची निर्मीती केली असुन, या व्हॅन मधुन अधिकारी कर्मचाना कर्णाचाऱ्याना निर्जतुकरण केले जाणार आहे. अवघ्या २४ तासात तयार केलेली ही व्हॅन विविध तपासणी नाक्यांवर कार्यरत राहणार आहे. विशेष म्हणजे अशाच पद्धतीने यासोबतच दुसऱ्या एका सॅनेटायझर व्हॅनची निर्मीती केली जाणार आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक श्री रमेश पवार यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्य्याच्या सीमा या गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांना लागुन असल्यासोबतच अतिदुर्गम भागात देखील या सीमा आहेत. अश्या ठिकाणी कार्यरत राहण्यासाठी या व्हॅन मधील सँनेटायझर यंत्रणा हि इन्वर्टरवर सुद्धा कार्यन्वीत राहु शकते, अशा पद्धतीची सोय यात करण्यात आली आहे. नुकतीच जिल्हा पोलीस मुख्यालयात या व्हॅनची चाचणी घेण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत असतांनाच पोलीस दलात दाखल झालेल्या या फिरत्या सॅनेटायझर व्हॅनमुळे दिवसरात्र रस्त्यावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस दलातील जवानांना विशेष सुरक्षेसोबतच मानसिक आधार मिळणार आहे. स्थानिक गुन्हा अनवेशन शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किशोर नवले व मुख्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. नंदुरबार पोलिंसाची सॅनिटायझेशन व्हॅननंदुरबार(प्रतिनिधी) :- जिल्हा पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागाने सॅनिटराझर व्हँनची निर्मीती केली असुन, या व्हॅन मधुन अधिकारी कर्मचाना कर्णाचाऱ्याना निर्जतुकरण केले जाणार आहे. अवघ्या २४ तासात तयार केलेली ही व्हॅन विविध तपासणी नाक्यांवर कार्यरत राहणार आहे. विशेष म्हणजे अशाच पद्धतीने यासोबतच दुसऱ्या एका सॅनेटायझर व्हॅनची निर्मीती केली जाणार आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे...

Read More

जिल्ह्यात बाहेरून आलेल्यांनी माहिती द्यावी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांचे आवाहन

नंदुरबार (प्रतिनिधी):- जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या सर्व व्यक्तींनी प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक असून अशी माहिती लपविणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. आशा व्यक्तींची माहिती देण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात आले असून, अश्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या देशात सर्वत्र कोरोना विषाणुचा संसर्ग मोठया प्रमाणावर झालेला आहे . नंदुरबार जिल्ह्यालगतचे . मालेगाव , नाशिक , जळगाव तसेच सेंधवा ( मध्यप्रदेश ) सरहद्दीवर कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले रुग्ण आढळुन आलेले आहेत. सदर परिसरातुन तसेच इतर राज्य व देश येथुनही मोठया प्रमाणावर नागरिक नंदुरबार जिल्ह्यात आलेले असल्याची दाट शक्यता आहे. यातुन नंदुरबार जिल्ह्यात कोरोना विषाणुचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, दिनांक ०९ एप्रिल २०२० पुर्वीच्या ०५ दिवस आधी जे नागरिक अन्य जिल्हा, राज्य, देश येथुनं नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्यास आलेले असतील त्यांनी तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशन, स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक आरोग्य विभाग यांचेशी संपर्क साधुन त्यांचे प्रवासाबाबतची सर्व सत्य माहिती कळवावी. जेणेकरुन प्रशासनास त्यावर प्रभावी उपाययोजना करणे शक्य होईल. प्रशासनापासुन माहिती लपविणाऱ्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असे या पत्रकात म्हटले आहे.पत्रकात पुढे म्हटले आहे की, याद्वारे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, गेल्या पाच दिवसापुर्वीपासुन बाहेरुन आलेल्या सर्व व्यक्तीबाबत आपणास असलेली माहिती तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष , नंदुरबार येथे फोन क्र . ०२५६४२१०११३ या क्रमांकावर द्यावी . माहिती देणाऱऱ्याचे नाव व...

Read More

भाऊ-बहिणीकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 14 हजार रुपये

नंदुरबार (प्रतिनिधी) – कोविड-19 प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती पुढे येत असून शासकीय सेवेत असलेल्या शैलंद्र मराठे आणि माधुरी इंगळे या भाऊबहिणीच्या जोडीने या कार्यासाठी 14 हजार 200 रुपये देऊन आदर्श घालून दिला आहे. दोघांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचेकडे धनादेश सादर केले. माधुरी या जिल्हा शासकीय रुग्णालयात डायलिसिस टेक्निशिअन आहेत. त्यांनी वाढदिवसानिमित्त वेतनाच्या 25 टक्के 4000 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले.  शैलेंद्र यांनी बहिणीकडून प्रेरणा घेत 10 हजार 200 रुपयांचे योगदान दिले. ते स्वते: राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक जाणिवेतून ही मदत केल्याचे शैलेंद्र यांनी...

Read More

रेशन दुकानदार व गॅस एजन्सी प्रतिनिधींची बैठक

नंदुरबार (प्रतिनिधी) – प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना मोफत तांदूळ वितरण करताना नियमांचे पालन  न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात रास्त भाव दुकानदार संघटनांचे प्रतिनिधी, गॅस एजन्सी संचालक, केरोसीन अर्धघाऊक विक्रेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, वसुमना पंत, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्ह्यातील तहसीलदार आदी उपस्थित होते. बैठकीत धान्य वाटपाचा आढावा घेण्यात आला.डॉ.भारुड म्हणाले, केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ उपलब्ध करून दिल्याने लाभार्थ्यांना एप्रिल, मे आणि जून 2020 साठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत दिलेल्या अन्नधान्याचे त्या-त्या महिन्यात वाटप होईल. रास्त भाव दुकानदारांनी वाजवीपेक्षा जास्त दर आकारणी करू नये. एप्रिलमध्ये अंत्येादय  व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित नियतन वाटप होईल. ई-पॉस मशिनवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या मोफत तांदळाचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात यावे. लाभार्थ्यांनी नियमित अन्नधान्याची उचल केल्याची खातरजमा करून नंतरच मोफत धान्य द्यावे. मोफत वितरण केलेल्या  धान्याची पावती दुकानदारांनी सांभाळून ठेवावी, असे त्यांनी सांगितले. उज्वला गॅस येाजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत सिलेंडर देण्याबाबतही यावेळी सूचना देण्यात आल्या. केरोसिन दुकानदारांनी केरोसिन वाटप करताना फोटा किंवा व्हिडीओद्वारे नांद ठेवावी व केवळ पात्र लाभार्थ्यांनाच केरोसिन मिळेल याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकारी...

Read More

अरविंद पाटील यांची अकरा हजाराची मदत

नंदुरबार (प्रतिनिधी):- येथील निलेश मेडिकल या फर्मचे संचालक श्री अरविंद पाटील यांनी कोरोना या विषाणूंच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अकरा हजार रुपये रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांच्याकडे सुपूर्द केला आहे.कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात प्रयत्न केले जात आहेत. शासनाने या राष्ट्रीय आपत्तीमध्ये आर्थिक मदत करण्याचे जनतेला आवाहन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नंदुरबार येथील मेडिकल व्यवसायिक निलेश मेडिकल या फर्मचे संचालक श्री अरविंद पाटील यांनी मुख्यमंत्री मदत निधीसाठी अकरा हजार रुपये रक्कमेचा जनादेश नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत दैनिक खान्देश गौरवचे संपादक श्री हिरालाल चौधरी उपस्थित होते. अरविंद पाटील यांनी मदतीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. सर्व देशवासियांनी आपापल्या परीने प्रधानमंत्री सहायता कोष किंवा मुख्यमंत्री मदत निधीमध्ये मदत करण्याचे आवाहन अरविंद पाटील यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!