Author: Amit Kapadne

कोपर्ली गटात शिवसेनेचे उमेदवार राम चंद्रकांत रघुवंशी हे 1126 मतांनी आघाडीवर

नंदूरबार (जगदीश ठाकुर)- नंदुरबार तालुक्यातील प्रतिष्ठित असलेल्या कोपर्ली गटात शिवसेनेचे उमेदवार राम चंद्रकांत रघुवंशी हे 1126 मतांनी आघाडीवर आहेत तसेच कोपरली गणातील शिवसेनेचे उमेदवार कलाबाई चेत्राम भिल या विजयी झाल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्‍या कोपर्ली गटाच्या निकालाकडे लक्ष लागले असून लवकरच निकाल हाती येणार...

Read More

खोंडामळी गटात व गणात भाजपाचे तिघे विजयी

नंदूरबार (जगदीश ठाकुर)- नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी गटातील भाजपाच्या शोभा शांताराम पाटील विजयी तर खोंडामळी गणात भाजपाच्या मंगल विक्रम भिल आणि कोरिट गणातून भाजपाचे प्रकाश कृष्णराव गावित हे विजयी झाले आहेत. तसेच होळ हवेली गणातून अपक्ष उमेदवार दीपक मराठे हे सेना पुरस्कृत असून विजयी झाले...

Read More

*पातोंडा गट, गण व कोळ्दे गटात भाजपाचा झेंडा फडकला*

नंदुरबार- (जगदीश ठाकुर)- नंदुरबार तालुक्यातील पातोंडा व गण आणि कोळदे गटात भाजपाचा झेंडा फडकला आहे. पातोंडा गटातून भाजपाच्या विजया प्रकाश गावित या विजयी झाल्या आहेत. तर पातोंडा गणातून भाजपाच्या लताबेन पाटील या 878 मतांनी विजयी झाले आहेत. मतमोजणी परिसराच्या बाहेर भाजपाच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात येत आहे तसेच नंदुरबार तालुक्यातील कोळदे गटातील भाजपाचे उमेदवार योगिनी अमोल भारती या 301 मतांनी विजया झाल्या...

Read More

*नंदुरबार तालुक्यात सुरुवातीला शिवसेनेचे खाते उघडले*

गुजरभवानी गणातून धर्मेंद्रसिंह परदेशी 931 मतांनी विजयी नंदुरबार- (जगदीश ठाकुर) नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतमोजणीला आज बुधवारी सकाळी दहा वाजेपासून जिल्हाभरातील तहसील कार्यालयामध्ये सुरुवात झाली आहे. नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुल मध्ये मतमोजणी प्रक्रिया घेण्यात येत आहे. नंदुरबार तालुक्यात मतमोजणीतून सुरुवातीलाच शिवसेनेने गणामध्ये खाते उघडले आहे. नंदुरबार तालुक्यातील गुजरभवानी गणातून शिवसेनेचे उमेदवार धर्मेंद्रसिंह परदेशी हे 931 मतांनी विजयी झाल्याची माहिती मिळाली...

Read More

*मिनी मंत्रालयासाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत झाले 53 टक्के मतदान*

*नंदुरबार- (जगदीश ठाकुर)* नंदुरबार जिल्हा परिषद  व 6 पंचायत समितीसाठी काल दि. 7 जानेवारीला मतदान प्रक्रिया घेण्यात आली. सकाळी साडे सात वाजेपासून सुरू झालेल्या मतदानासाठी सकाळच्या सुमारास मतदान केंद्रांवर मतदारांची अल्प गर्दी दिसून आली. दुपारनंतर मतदानासाठी मतदान केंद्रांवर पोहोचल्याने दुपारी साडेतीन वाजेपर्यंत नंदुरबार जिल्हाभरात 53.29 टक्के इतके मतदान झाले होते. थंडीचा कडाका असल्यानं सकाळच्या सुमारास मतदारांनी घराबाहेर निघणे टाळले. त्यामुळे सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मतदान टक्केवारी कमी होती. 10 वाजेनंतर केंद्रांवर मतदार येऊ लागल्याने मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या आणि दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढली. मतदानासाठी येणाऱ्या वृद्ध व दिव्यांग  मतदारांना विद्यार्थ्यांसह तरुणांनी मदत कार्य करीत केंद्रापर्यंत पोहोचवले. जिल्ह्यातील गावांमध्ये मतदानासाठी एकच लगबग दिसून आली. लोकप्रतिनिधींनीही देखील आपापल्या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजाविला. जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या 112 गणांसाठी जिल्ह्यात 1 हजार 229 मतदान केंद्र असल्याने अनेक मतदारांनी मतदान केले. अनेकांनी सेल्फी फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित करीत मतदारांना आपणही मतदान करा, असे आवाहन केले. दिवसभर ग्रामीण भागातील प्रत्येक गावात मिनी मंत्रालयासाठी लोकशाहीचा महोत्सव भरल्याचे दिसून आले.  राजकीय नेते दिवसभर गट, गणांमध्ये ठाण मांडून होते. काही किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजता दरम्यान 9. 28 टक्के इतके मतदान जिल्ह्याभरात झाले होते. त्यानंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ होऊन सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत 28.87 टक्के मतदान जिल्ह्याभरात झाले. दुपारनंतर मतदारांच्या रांगा लागल्याने दुपारी दिड वाजे दरम्यान टक्केवारी एकूण 39.43 टक्क्यांवर पोहोचली. अनेक मतदार मतदानासाठी केंद्रांवर पोहोचल्याने दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्याभरात सरासरी 53.29 टक्के इतके मतदान झाले. दुपारी...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!