महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वाहनातून चोरी होत असल्याच्या संशयावरून सुजलॉन कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी चक्क अधिकाऱ्यांच्या वाहनाच्या तब्बल 12 किलोमीटर पाठलाग केला. रात्रभर चाललेल्या नाट्यमय घडामोडीनंतर हा प्रकार साधा तक्रारी अर्जावर संपवण्यात आला. नंदुरबार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर अभिजित गोल्हार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर रवींद्र ढोले व डॉ. स्वप्नील मालखेडे तालुका आरोग्य अधिकारी, अक्कलकुवा हे ठाणें येथे आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी गेले होते. बैठक आटोपून सर्व अधिकारी शासकीय वाहनाने परतीच्या प्रवासाला असताना दहिवेल ते छडवेल दरम्यान धनाई पुनाई फाट्याजवळ अज्ञात इसमांनी त्यांचे वाहन अडविले यावेळी वाहन चालकाने काच उघडून संबंधितांशी बोलणे सुरू करतात त्या इसमाने त्यांच्याजवळील बंदुका गाडीकडे रोखल्या. यामुळे भेदरलेल्या वाहन चालक अर्जुन शिरसाठ यांनी बोलेरो वाहन वेगात छडवेल च्या दिशेने पळविले. यानंतर अंधारातून आलेल्या वॅगनार वाहनाने त्यांच्या महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वाहनातून चोरी होत असल्याच्या संशयावरून सुजलॉन कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी चक्क अधिकाऱ्यांच्या वाहनाच्या तब्बल 12 किलोमीटर पाठलाग केला. रात्रभर चाललेल्या नाट्यमय घडामोडीनंतर हा प्रकार साधा तक्रारी अर्जावर संपवण्यात आला. नंदुरबार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर अभिजित गोल्हार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर रवींद्र ढोले व डॉ. स्वप्नील मालखेडे तालुका आरोग्य अधिकारी, अक्कलकुवा हे ठाणें येथे आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी गेले होते. बैठक आटोपून सर्व अधिकारी शासकीय वाहनाने परतीच्या प्रवासाला असताना दहिवेल ते छडवेल दरम्यान धनाई पुनाई फाट्याजवळ अज्ञात इसमांनी त्यांचे वाहन अडविले यावेळी वाहन चालकाने काच उघडून संबंधितांशी बोलणे सुरू करतात त्या इसमाने त्यांच्याजवळील बंदुका गाडीकडे रोखल्या. यामुळे भेदरलेल्या वाहन चालक अर्जुन शिरसाठ यांनी बोलेरो वाहन वेगात छडवेल च्या दिशेने पळविले. यानंतर अंधारातून आलेल्या वॅगनार वाहनाने त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. यादरम्यान वाहनातील अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर प्रशासकीय घडामोडी घडून पोलीस यंत्रणा सक्रिय झाले दरम्यान नंदुरबारला पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले नंदुरबार निघालेल्या पोलिसांनी संबंधित वॅगनार वाहन व दोन मोटर सायकली छडवेल जवळील एका ढाब्यावरून ताब्यात घेतल्या वाहने व त्यासोबत पाच जणांना निजामपूर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यानच्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. नंदुरबारला पोचलेले वैद्यकीय अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह निजामपूरला पोहोचले मात्र त्या ठिकाणी फिर्याद दाखल न करता केवळ तक्रारी अर्ज देऊन प्रकरण शांत करण्यात आले.
संबंधित वॅगनार वाहनातील व मोटरसायकल वरील माणसे सुजलॉन कंपनीच्या सुरक्षारक्षक कंपनीचे कर्मचारी होते व महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वाहनातून चोरी होत असल्याच्या संशयावरून त्यांनी या वाहनाचा पाठलाग केला असल्याचा खुलासा करून या प्रकरणाची बोळवण करण्यात आली.
महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वाहनावर पिस्तुल ताणने, फायरिंग करणे यामागे केवळ चौकशी हाच हेतू होता का? की वाहने लुटण्याचा हा नवा धंदा छडवेल परिसरात सुरू झाला आहे; हे येणारा काळच सांगेल.