नंदुरबार (प्रतिनिधी) – स्टेट बँक ऑफ इंडिया नंदुरबार शाखेत पगार खाते असलेल्या मृत कर्मचाऱ्याच्या नातलगांना वलेम रकमेचे वितरण मान्यवरांच्या उवस्थितीत करण्यात आले. कै चरणसिंग धुड्या गावित यांचे दुदैवाने दि ०२/१२/२०२१ रोजी दोंडाईचा – नंदुरबार रोडवर अपघाती निधन झाले. चरणसिंग हे रेल्वे पोलीस फोर्स दोंडाईचा येथे कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटूंबिय बँकेत खाते बंद करण्यासाठी आले असता स्टेट बँकेतील अधिकाऱ्यांनी हे खाते सॅलरी पॅकेज अंतर्गत असल्याने त्याला विभा संरक्षण असते, अशी माहिती त्यांना दिली व त्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांच्या वारसांनी कागदपत्रे आणली असता त्यांना सॅलरी पॅकेज या योजनेअंतर्गत रु .30,00,000 ( रु . तीस लाख मात्र ) विमा संरक्षक रक्कम दि . 27/05/2022 रोजी त्यांच्या पत्नी श्रीमती कल्पनाबाई चरणसिंग गावीत यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. स्टेट बँकेच्या या योजनेअंतर्गत कुठलेही शुल्क आकारले जात नाही. या आधीही बँकेने वेगवेगळ्या योजना ग्राहकांना सांगून त्यांचे खाते व त्यांचा फायदा कसा होईल, या बाबतीत मार्गदर्शनपर मेळावे आयोजित करून जनजागृती केली आहे . दि . 08/06/2022 रोजी नंदुरबार येथे झालेल्या कार्यक्रमात या रकमेच्या धनादेशाचे वितरण नंदुरबार जिल्हाचे लोकप्रिय जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री, आमदार डॉ . विजयकुमार गावीत व स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर श्री सुरजीत कुमार साह यांचे हस्ते करण्यात आले. आजादी का अमृत महोत्सव ” या कार्यक्रमात स्टेट बँकेच्या इतरही उपक्रमांची , योजनांची माहीती देण्यात आली . या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खमी मॅडम , आमदार डॉ . विजयकुमार गावीत , स्टेट बाँकेचे ” रिजनल मॅनेजर श्री. सुरजीत कुमार साह यांच्यासह अग्रणी बँकेचे श्री जयंत देशपांडे , नाबार्डचे सहा . महाप्रबंधक श्री प्रमोद पाटील , मुख्य प्रबंधक प्रकाश रणधीर, स्टेट बँक बँक नंदुरबारचे मुख्य प्रबंधक श्री राजेश मिश्रा व मान्यवर उपस्थित होते .