नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र सरकारकडील विशेष साहाय्य योजनेंतर्गत नंदुरबार,नवापूर व शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या युवकांना वाहन चालक कम ऑटोमोबाईल मॅकनिकचे प्रशिक्षण देण्यासाठी 23 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
वाहन चालक कम ऑटोमोबाईल मॅकेनिकचे प्रशिक्षणासाठी अर्जासोबत जातीचा दाखला, दारिद्रय रेषेखालील दाखला किंवा वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे. लाभार्थी इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य असेल.तसेच यापूर्वीइतर योजनेतून प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा. अर्जासोबत दिव्यांग दाखला, आधार कार्ड, छायाचित्र, शैक्षणिक कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील.
योजनेचे अर्ज 8 एप्रिल 2022 पासून उपलब्ध असून अधिक माहितीसाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,नवापूर रोड, नंदुरबार येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.