नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या सन 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी वसंतराव नाईक तांडा /वस्ती सुधार योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 डिसेंबर 2021 पर्यंत गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.
योजनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे : योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी भटक्या जमातीचा असावा, सन 2018-19 ते 2022-23 या वर्षात बृहत आराखड्यात विद्युतीकरण, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, गटारे, शौचालये, समाजमंदिर, वाचनालय आदी कामे मंजूर असावीत. जिल्हास्तरीय समिती मार्फत प्राप्त प्रस्ताव मंजूर करुन प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास पाठविण्यात येतील. बृहत आराखड्यात नमूद नसलेली कामे समाविष्ट करण्यासाठी गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्याकडे संपर्क साधून पुरवणी बृहत आराखडा तयार करावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, टोकरतलाव रोड,नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.