नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते बंधारपाडा येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकेत वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, वनक्षेत्रपाल सी.आर.अवसरमल, दिलीप नाईक आदी उपस्थित होते. ॲड.पाडवी यांनी रोपवाटीकेची पाहणी केली. तलाव परिसरात वृक्षलागवड आणि संवर्धन चांगल्यारितीने केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे आणि सातपुडा परिसर हिरवा करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.