नंदुरबार – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांनी अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.