नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : लूपिन फाऊंडेशनतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस 50 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. फाऊंडेशनचे जिल्हा समन्यक दिपक जाधव यांनी हा धनादेश राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्याकडे सुपूर्द केला.
पालकमंत्री पाडवी यांनी लुपिन फाऊंडेशन कोरोना प्रतिबंध आणि लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनास करीत असलेल्या सहकार्याबद्दल फाऊंडेशनच्या सदस्यांचे कौतुक केले. सर्वांच्या सहकार्याने कोरोना संकटाचा यशस्वीपणे मुकाबला करणे शक्य होईल आणि जिल्हा कोरोनामुक्त करणेदेखील शक्य होईल, असे यावेळी ॲड .पाडवी म्हणाले.