नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील रक्त केंद्राच्या कामात समन्वय राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
समन्वयक अधिकारी रक्त संक्रमण केंद्र आणि शासकीय रक्त केंद्रामार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी स्थानिक यंत्रणांशी समन्वय साधतील. तसेच जिल्ह्यात उपलब्ध रक्तसाठ्याबाबत दैनंदिन आढावा घेतील. जिल्ह्यातील सर्व रक्त केंद्र व्यवस्थापकांनी दररोज सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्याकडील रक्तसाठ्याची ग्रुपनिहाय माहिती जिल्हा समन्वयकांना सादर करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.