नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये उप निरीक्षक, प्रधान आरक्षक, जीडी पदाकरीता कत्राटी पद्धतीने 50 वर्षाखालील माजी सैनिकांची भरतीसाठी 15 मार्च 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील भरतीसाठी इच्छुक माजी सैनिकांनी त्यांचे अर्ज सी.आय.एस.एफ च्या ईमेलवर पाठविण्यात यावेत. अर्जाचा नमुना व ईमेल पत्ता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आला असून माजी सैनिकांनी या भरतीचा लाभ घ्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.