नंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार चे गिर्यारोहक गोविंद अग्रवाल ह्यांचा नेतृत्वाखाली 16 जणांनी “मांगीतुंगी” ह्या जैन धर्मियांच्या पवित्र शिखरावर यशस्वी चढाई करून नंदुरबार च्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे.
मांगीतुंगी अनुभवणे हा एक थरारच आहे. मांगीतुंगी चढताना दोन अप्रतिम सुंदर लेण्या लागतात. त्या सुद्धबुद्धीजींच्या नावाने ओळखल्या जातात. मांगी व तुंगी हे पर्वताचे दोन टोके आहेत. येथे जाण्यासाठी साडेचार हजार पायऱ्या चढाव्या लागतात. तुंगी पर्वतावर प्राचीन लेणी आहेत. गिरीराज नावाचे जलकुंड, अंतरिक्ष चैत्यालय, चंद्रप्रभू भगवंतांची मूर्ती पहाते येते. मांगीतुंगीच्या मांगी या शिखराच्या खालच्या टप्प्यावर जगातील अखंड दगडातील सर्वात उंच १०८ फूटी श्री भगवान ऋषभदेवाची मूर्ती सध्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. त्यात १३ फुटाचे कमळ व १०८ फूट उंचीची १२१ फूट उंचीची मूर्ती पाहताना नवल वाटते.
ज्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक मध्ये झालेली आहे.
इथून पुढे अधिक उंची वर गगनाला भिडणारे मांगी हे शिखर आहे, इथे आल्यावर सर्व थकवा क्षणात दूर होतो.
शिखरावर इ.सन 600 मध्ये कोरलेल्या जैन तीर्थांकरांच्या मुर्त्या लक्ष वेधून घेतात.
मांगी शिखराला प्रदक्षिणा घालून पुढील प्रवास सुरु होतो तुंगी शिखराकडे !
तुंगी शिखरावर देखील जैन धर्मीय इतिहास कालीन कोरीव मुरत्या बघावयास मिळतात !
डोंगरावर ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेल्या अनेक गुहा असून त्या महावीर गुहा, शांतीनाथ, आदिनाथ, पार्श्व म्हणून ओळखतात. मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून, ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात. येथे सात मंदिरे असून अनेक जातानाच्या मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात. तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत. मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे.
मांगीतुंगी शिखरावर चढाई चा हा प्रवास अतिशय कठीण, चित्तथरारक आणि अविस्मरणीय असा आहे, भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी- जय शिवाजी अश्या घोषणानी सारा परिसर चैतन्यमय झाला होता !


10 वर्षाचा मुला पासून 55 वर्षाच्या तरुणांनी सहभाग नोंदवला हे विशेष ! संकेत पाटील, जयेश पाटील, मानव पाटील, मेघा मराठे, पवन ठाकरे, केदार पाटील, रविदा जोशी, सौ ऋचा जोशी,
जयप्रकाश जयस्वाल, सौ निशा जयस्वाल, राहुल खेडकर, रुत्वा खेडकर, अक्षय अग्रवाल, सौ अश्विनी अग्रवाल, गोविंद अग्रवाल आणि कृष्णा बोरसे अशा एकूण १६ लोकांनी सहभाग नोंदवला.